HW News Marathi
क्राइम

दोन अधिका-याच्या पत्नीमधील भांडणाने सैन्याची नाचक्की

नवी दिल्ली | दोन अधिका-याच्या पत्नीमधील भांडणाने सैन्याची नाचक्की झाली आहे. याप्रकरणी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल झाली असून आता पीएमओने याप्रकरणी सैन्याकडून अहवाल मागवला आहे.

गेल्या आठवड्यात भटिंडातील लष्करी केंद्रात सैन्यातील अधिका-यांच्या पत्नीच्या संघटनेतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कमांडिंग आॅफिसरच्या पत्नीने लेफ्टनंट कर्नलच्या पत्नीच्या श्रीमुखात भडकावली. या दोघींमध्ये कार्यक्रमात उशिरा येण्यावरून वाद झाला होता.

या कार्यक्रमात सैन्यातील जवान आणि अधिकारी उपस्थित होते. सर्वांसमक्ष हा प्रकार घडला. या दोघींमधील वाद सोडवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. आता लेफ्टनंट कर्नलने याप्रकरणी पंतप्रधान कार्यालय आणि मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याशिवाय पंजाबचे पोलीस महासंचालक आणि सीबीआयचे संचालक यांच्याकडेही याप्रकरणात दाखल करण्यात आली. ह्यसैन्यातील वरिष्ठ अधिकाºयाच्या पत्नीने कनिष्ठ अधिका-याच्या पत्नीला सर्वांसमक्ष मारहाण केली. तिला धमकावले. या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळण्याची शक्यता कमीच असून पीडितेचा छळ होऊ शकतो, असे या अधिका-याने तक्रारीत म्हटले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांनी केलं अभिनेत्री ममता कुलकर्णीला फरार घोषित

News Desk

आमदार नितेश राणे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

News Desk

भोकरमध्ये ६७ हजाराची अवैध देशी दारु  जप्त

News Desk