HW News Marathi
क्राइम

पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची गळा चिरुन हत्या.

अंबादास

उल्हासनगर (गौतम वाघ) : उल्हासनगर जवळ असलेल्या आशेळा गावात एका बाहेरख्याली पत्निने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीचा गळा चिरुन खुन केल्याची घटना २४ ऑक्टोंबर च्या रात्री घडली असुन काल त्या पतीचे शव आशेळा गांवच्या शिवारात मिळाले आहे . विठ्ठलवाडी पोलिसानी पत्नि व तिचा प्रियकर यास अटक केली असुन शव मध्यवर्ती रुग्णालयात शवविछेदना करिता पाठविले आहे .

आरोपी, छाया, सोनू

उल्हासनगर जवळच आशेळा गांव असुन त्या गांवात अंबादास जयंवत बाबळसुरे हे आपली पत्नि छाया व तीन मुलासह राहत होता . तो मोलमजुरी करुन आपल्या कुटूंबाचा उदर निर्वाह करत होता . त्यातच त्याची पत्नि छाया हिचे जवळच राहणारा सोनू उर्फ लक्ष्मण मरिअप्पा मल्लौर (२०) याच्या सोबत सुत जुळले . यांचे प्रेम प्रकरण सुरु असताना पती अंबादास हा त्यांच्या प्रेम प्रकरणात अडसर ठरत होता . तेव्हा २४ ऑक्टोंबर च्या रात्री छाया व सोनू उर्फ लक्ष्मण यांनी संगनमत करुन अंबादास हा जेवन करुन झोपला असता या दोघानी अंबादास याच्या तोंडावर उशी दाबुन त्याच्या गळ्यात चाकु खुपसुन गळा चिरुन त्याला ठार मारले . आणि त्याचा मृतदेह मोटार सायकल वर ठेवुन घरामागील शिवारात फेकुन दिला . दरम्यान अंबादास चा मृतदेह सडल्या मुळे दुर्घंदी पसरल्याने त्या परिसरातील नागरिकांनी विठ्ठलवाडी पोलिसांना कळवले. पोलिसांनी अंबादास चा मृतदेह ताब्यात घेवुन तेथील रहिवासीना विचारपुस केले असता त्यांची पत्नी छाया बाबळसुरे हीला दाखवला . मात्र छाया हिने नवरा हरविल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती . तर पोलिसानी तिला विचारपुस केल्यावर छाया हिने कबुल केले की प्रियकराच्या मदतीनेच पतीचा खुन केल्याची कबुली दिली आहे . तेव्हा विठ्ठलवाडी पोलिसानी छाया व सोनू उर्फ लक्ष्मण यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असुन दोघाना ही अटक केली आहे . न्यायालयात हजर केले असता न्यायालयांने 31आँक्टोबर पर्यंत पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे या गुंह्याचा तपास वरीष्ट पोलिस निरीक्षक सुरेंद्र शिरसाट हे करत आहेत .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाटोद्यात जुगार खेळणाऱ्या २२ जणांना अटक, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त      

News Desk

वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जीएसटी चुकवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल

Aprna

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाला बेड्या

News Desk