HW News Marathi
क्राइम

उल्हासनगर महापालिका आयुक्तांसह डीसीपी, एसीपींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार

उल्हासनगर(गौतम वाघ)-उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना जातीयवाचक बेताल वक्तव्य भोवलंय.

जुलै महिन्यात पालिकेतील गटनेत्यांच्या केबिन वाटपावरून आयुक्त आणि रिपाई नगरसेवकांची वादावादी झाली होती. यावेळी आयुक्तांनी दलित समाजाला उद्देशून आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळं आयुक्तांवर ऍट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाई नगरसेवक भगवान भालेराव यांनी पोलिसांकडे केली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली होती. यानंतर भालेराव यांनी कल्याण सत्र न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आज याप्रकरणी महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासह गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणारे पोलीस उपायुक्त अंकित गोयल, एसीपी विकास तोटावार आणि पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्याविरोधात ऍट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले. त्यामुळं आयुक्त आणि पोलीस अडचणीत सापडलेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ट्रक आणि कारमध्ये भिषण अपघात, 9 जण जखमी

News Desk

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Chetan Kirdat

गणपती विसर्जन मिरवणुकीत तरूणावर चाकू हल्ला, तरूणाचा मृत्यू

News Desk