उत्तम बाबळे
नांदेड :- विशेष पोलीस पथकाने २१ जून रोजी माै.वाळकी (बा )ता.हदगाव येथील दारू विक्री करणा-यावर छापा टाकून अवैध विक्रीसाठी नेत असलेली १ लाख ४० हजार रुपये किमतीची देशी दारु व दोन टेंपो जप्त केले असून तिघांना अटक केली आहे.या कारवाईत १० लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्थापलेल्या विशेष पोलीस पथकाने २० जून रोजी बिलोली तालुक्यात वेगवेगळ्या चार ठिकाणी छापे मारली व या मोहिमेवरुन नांदेडकडे परत येत असतांना त्यांना माै.वाळकी (बा.) ता.हदगाव येथील सर्जेराव सुभाष माळवदे हा इसम त्याच्या घरुन वाळकी,हदगाव,हिमायतनगर,उमरी येथे अवैध विक्रीसाठी देशी दारुचा पुरवठा करत असल्याची गोपनिय माहिती मिळाली.या पथकाने मिळालेल्या माहिती संदर्भात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना कळविले व त्यांच्या आदेशाने दोन पंच सोबत घेऊन पथक प्रमुख सहा.पो.नि.ओमकांत चिंचोलकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी लाठकर,जगताप,वानखेडे,कुलकर्णी,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.