HW News Marathi
क्राइम

हदगावमध्ये अवैध दारू जप्त , तिघांना अटक

उत्तम बाबळे

नांदेड :- विशेष पोलीस पथकाने २१ जून रोजी माै.वाळकी (बा )ता.हदगाव येथील दारू विक्री करणा-यावर छापा टाकून अवैध विक्रीसाठी नेत असलेली १ लाख ४० हजार रुपये किमतीची देशी दारु व दोन टेंपो जप्त केले असून तिघांना अटक केली आहे.या कारवाईत १० लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्थापलेल्या विशेष पोलीस पथकाने २० जून रोजी बिलोली तालुक्यात वेगवेगळ्या चार ठिकाणी छापे मारली व या मोहिमेवरुन नांदेडकडे परत येत असतांना त्यांना माै.वाळकी (बा.) ता.हदगाव येथील सर्जेराव सुभाष माळवदे हा इसम त्याच्या घरुन वाळकी,हदगाव,हिमायतनगर,उमरी येथे अवैध विक्रीसाठी देशी दारुचा पुरवठा करत असल्याची गोपनिय माहिती मिळाली.या पथकाने मिळालेल्या माहिती संदर्भात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना कळविले व त्यांच्या आदेशाने दोन पंच सोबत घेऊन पथक प्रमुख सहा.पो.नि.ओमकांत चिंचोलकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी लाठकर,जगताप,वानखेडे,कुलकर्णी,पायनापल्ले, निरणे,जिंकलवाड,गंगुलवार, आवातिरक आणि चालक देवकत्ते यांनी २१ जून २०१७ रोजी पहाटे २:२० वाजताच्या दरम्यान माै.वाळकी येथे सर्जेराव माळवदे यांच्या घरी छापा मारला असता तेथे लिलँड दोस्ट छोटा हत्ती क्र.एम.एच.२६ ए.डी.७६४५ व टाटा मॅजिक छोटा हत्ती क्र.एम.एच.२६ ए.डी.८७७३ या दोन चार चाकी वाहनात देशी दारु भिंगरीचे प्रत्येकी १५ बाॅक्स भरुन घेऊन जात असलेले सर्जेराव सुभाष माळवदे (२२),गजानन हिरामन फसेगावकर ( ३९), गजानन सुभाष माळवदे,तिघे ही रा.वाळकी,ता.हदगाव जि.नांदेड हे रंगेहात सापडले.या तिघांना पथकाने ताब्यात घेतले व १ लाख ४४ हजार रुपयाची देशी दारु,९ लाख रुपये किमतीचे दोन टेंपो असा एकूण १० लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सहा.पो.नि.ओमकांत चिंचोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हदगाव पोलीसांत या प्रकरणी उपरोक्त तिघां विरुद्ध मुंबई प्रो.कायदा कलम ६५ (ई),८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामती हादरलं ! अजित पवारांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांवर गोळीबार

News Desk

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा

News Desk

पोषण आहाराच्या गैरव्यवहारात दानवेंचा सहभाग

News Desk