HW News Marathi
क्राइम

दरोडेखोरांकडून बँक अधिकाऱ्यासह पत्नीचा खून; दोन मुली जखमी

बीड : येथील एका बँक अधिकाऱ्याच्या घरावर दरोडा टाकत दरोडेखोरांनी अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना आज पहाटे घडली. या हल्ल्यात दरोडेखोरांच्या मुलीही जखमी झाल्या आहेत. या हत्याकांडामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आदिनाथ घाडगे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते बीडच्या भवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेत प्रमुख वसुली अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. गेवराईतील सरस्वती कॉलनीतील त्यांच्या घरावर पहाटे साडेतीनच्या सुमारास दरोडेखोरांनी हल्लाबोल केला.

दरोडेखोरांनी ठोठावलेले दार उघडणाऱ्या घाडगे यांच्या पत्नी अलका यांची प्रथम हत्या करण्यात आली. त्यानंतर झोपेत असलेल्या आदिनाथ आणि बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव आणि दुसरी मुलगी स्वाती घाडगे यांच्यावरही हल्ला झाला. तान्हुल्याला उराशी कवटाळून वर्षाने दरोडेखोरांनी केलेले वार स्वतः झेलले. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली असून तिला औरंगाबादला हलविण्यात आले आहे. तसेच स्वातीही जखमी झाली आहे. या हल्ल्यानंतर दरोडेखोरांनी घाडगे यांच्या घरातील लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपणार; काय निर्णय येणार, याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

सचिन वाझेनं अनिल देशमुखांच्या सचिवाकडे दिल्या होत्या पैशांनी भरलेल्या 16 बॅगा….

News Desk

मंत्री पदाच्या लेटर हेडवर अशोक चव्हाणांच्या नावाने बनावट पत्रे

Aprna
देश / विदेश

आज निवडणुका झाल्यास भाजपचा पराभव !

News Desk

बंगळुरू- प्रचंड पैसा टाकून तसेच देशातील विविध माध्यमांच्या मालकांना हाताशी धरून भाजपने कॉँग्रेसमुक्त भारतचा विडा हाती घेतला आहे. परंतु भाजपच्या या प्रयत्नांना धक्का देणारे वृत्त कर्नाटकमधून हाती येत आहे. येथे आज निवडणुका झाल्यास कॉँग्रेस विजयी होईल, असा अंदाज सी फोर या संस्थेने व्यक्त केला आहे. हा अंदाज देशासाठी नसून केवळ कर्नाटक राज्यासाठी आहे. भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. परंतु त्यांना बहुमत मिळणे कठीण जाणार असल्याचे सी फोरने म्हटले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सी फोरने एकूण 165विधानसभा मतदारसंघातील 24 हजार 676 मतदारांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सूरू केलेली अन्न भाग्य स्कीम मतदारांना प्रचंड आवडली असल्याचे सर्व्हेमध्ये प्रामुख्याने समोर आले आहे. दरम्यान, दक्षिणेत झेंडा रोवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी शहा यांनी दौरा निश्चित केला होता परंतु हा सर्वे आल्यानंतर त्यांनी तीन वेळा कर्नाटकचा दौरा रद्द केला आहे.

Related posts

जम्मू- काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला

News Desk

छत्तीसगडमध्ये ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान

News Desk

मनसेप्रमुखांना तळीरामांच्या कोरड्या घश्याची चिंता, ‘सामना’तून बोचरी टीका

News Desk