HW News Marathi
क्राइम

धावत्या रेल्वेत तरुणांकडून छेडछाड, मायलेकींनी मारली रेल्वेतून उडी

कानपूर- छेडछाड करणाऱ्या तरुणांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी आई-मुलीने धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना कानपूरमध्ये घडली आहे. दोघी गंभीर जखमी झाल्या असून दोन तास रेल्वे रुळावर बेशुद्ध अवस्थेत पडून होत्या.

आई आणि मुलगी हावडा-जोधपूर एक्स्प्रेसमधून कोलकाताहून दिल्लीला येत होत्या. एक्स्प्रेसने हावडा स्थानक सोडल्यानंतर १५ तरुणांनी त्यांची छेड काढण्यास सुरुवात केली. पीडितेच्या आईने याबाबत रेल्वे पोलीस शिपायाला माहिती दिली. त्यानंतर शिपाई डब्यात आला आणि छेड काढणाऱ्या दोन ते तीन तरुणांना घेऊन गेला. काही वेळाने ते तरुण पुन्हा डब्यात घुसले. त्यांनी दोघींचीही छेड काढण्यास सुरुवात केली. त्यांनी मुलीला खेचण्याचा प्रयत्न केला. यामुळे भेदरलेल्या मायलेकींनी अब्रु वाचवण्यासाठी धावत्या एक्स्प्रेसमधून उडी मारली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. दोन तास त्या रेल्वे रुळांजवळ बेशुद्धावस्थेत पडून होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा तपास करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपसरपंचाचा निर्घृण खून

News Desk

पोलिसांनी केलं अभिनेत्री ममता कुलकर्णीला फरार घोषित

News Desk

मामी आणि भाच्याच्या नात्याला काळिमा; साकिनाकात मामाच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक

Aprna