HW News Marathi
क्राइम

अभिनेत्री अंजली श्रीवास्तवची आत्महत्या

मुंबई अभिनेत्री अंजली श्रीवास्तव राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. अभिनेत्री अंजली श्रीवासत्व अभिनय क्षेत्रात करियर करत होती. अधेरी जुहू परिसरातील परिमल सोसायटीमध्ये राहत होती. तिला तिचे नातेवाई वारंवार फोन करत होते मात्र ती फोन उचलत नव्हती. शेवटी तिच्या कुटूंबीयानी अंजली राहत असलेल्या घरमालकाला संपर्क साधला.

त्यांनी दुस-या चावीने घराचा दरवाजा उघडला असता अंजली पंख्याला गळपास घेतलेली होती. घरमालकांनी लगेच पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन अंजलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट किंवा अन्य साहित्य हाती लागलेले नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पूजा ददलानीवर मुंबई पोलिस नोंदविणार खंडणीचा गुन्हा?

News Desk

वाशिम येथील दरोडेखोर अटक

News Desk

एक कोटींची ब्राऊन शुगर जप्त

News Desk
क्राइम

साप चावल्यानं तरूणीचा मृत्यू

News Desk

उत्तम बाबळे

नांदेड :- जिल्ह्यातील माै.सावरगाव (मेट) ता.भोकर येथील एका २७ वर्षीय तरुणीचा झोपेत असतांना विषारी सर्पदंश झाल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून भोकर पोलीसात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे माै.सावरगाव (मेट) ता.भोकर येथील भोसले कुटूंब १६ जून २०१७ रोजी शेतातील काम करुन सायंकाळी घरी परतले.काम करुन थकल्यामुळे लगेच झोपी गेले.याच रात्री दरम्यान सर्वजन झोपलेल्या अवस्थेत असतांना एका विषारी सापाने घरात प्रवेश केला व कु.सुरमा नथू भोसले (२७) हिला दंश केला.यामुळे तिला उपचारार्थ भोकर येथील शासकिय ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.भोकर तहसिल कार्यालयातील सोनारी सज्जाचे तलाठी एस.जी.जगताप यांनी रुग्णालय व घटनास्थळी भेट दिली आणि रितसर पंचनामा केला आहे.सदरील पंचनाम्याचा अहवाल त्यांनी तहसिलदार व्यंकटेश मुंढे यांच्याकडे सादर केला असून तहसिलदार मुंढे यांनी तो ” स्व.गोपीनाथ मुढे नैसर्गीक आपत्ती व अपघात विमा ” मंजूरीसाठी तात्काळ वरीष्ठांकडे पाठविला आहे.तसेच भोकर पोलीसांनी या प्रकरणी १७ जून रोजी आकस्मीत मृत्यूची नोंद केली असून या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related posts

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी पेटवली प्रवासी बस

News Desk

मेजर गोगोई हॉटेल प्रकरणात दोषी, न्यायालयाकडून कारवाईचे आदेश

swarit

आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार उदय सामंत यांनी अफगाणी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

News Desk