HW News Marathi
क्राइम

छोटा राजनचा शार्प शुटर अटकेत

वृत्तसंस्था: कुख्यात गुंड छोटा राजनच्या टोळीतील शार्प शूटर खान मुबारक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने लखनौमधून खान मुबारकला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाला खान मुबारक लखनौमधील पीआयजी भागात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यानुसार शनिवारी पोलिसांच्या पथकाने शोधमोहीम राबवत खान मुबारकला बेड्या ठोकल्या. खान मुबारक हा छोटा राजनचा विश्वासू साथीदार म्हणून ओळखळा जातो. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. छोटा राजनविरोधात काम करणाºया टोळ्यांना संपवण्यात खान मुबारकचा हात होता. खान मुबारक हा झफर सुपारीचा भाऊ आहे. झफर सुपारी हा दाऊद इब्राहिमचा कट्टर विरोधक होता. छोटा राजनच्या टोळीत शार्प शूटरची भरती करण्याचे काम झफरकडे होते.

झफर सुपारीच्या इशाºयावरून खान मुबारक बॉलीवूडमधील एका सेलिब्रिटीच्या हत्येचा कट आखत होता. पण त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आल्याने हा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. खान मुबारक कोणाची हत्या करणार होता आणि हत्येचे नेमके कारण काय असावे हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या खान मुबारकला अज्ञातस्थळी नेण्यात आले असून तिथे त्याची कसून चौकशी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. बबलू श्रीवास्तव आणि झफर सुपारी या दोघांकडे शार्प शूटरची भरती करण्याचे काम होते. हे दोघेही पूर्वी शार्प शूटर म्हणूनच छोटा राजनसाठी काम करत होते. झफर सुपारीच्या भावाला अटक झाल्याने छोटा राजन टोळीला हा मोठा हादरा असल्याचे सांगितले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आदर्श आचारसंहितेमुळे जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

News Desk

ट्रॅक्टरच्या आमिष व फसवणूकप्रकरणी चेतन भालचंद्र नांदणीकरांना अटक

News Desk

बंदुकीच्या धाकावर बलात्कार

News Desk
देश / विदेश

देशाची वाटचाल गुलामगिरीकडे- राहुल गांधी

News Desk

वृत्तसंस्थाः सध्या एकापाठोपाठ एक करून देशातील लोकशाही संस्थांवर पद्धतशीरपणे ताबा मिळवला जात आहे. यामध्ये पंतप्रधान, सरकारी अधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग आहे. हे सर्व मिळून देशाला गुलामगिरीकडे ढकलत असल्याची जहरी टीका कॉँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी बेंगळुरू येथे केली. कर्नाटक सरकारकडून बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ या कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. आपल्या राजा नागडा आहे, परंतु ते मान्य करण्याची कोणा अंध भक्ताची तयारी नाही, कारण भक्त त्याच्या प्रेमात आकंठ बुडले आहेत, असे म्हणत त्यांनी मोदी यांच्यावर जहरी टीका केली हे.

सध्या देशात खरं बोलणाऱ्यांता गळा दाबला जात असून गरीब व दुर्बल घटकांना नामोहरम केले जात आहे. भाजप हे बेगडी सरकार आहे. हुकुमशाहीकडे देशाला नेण्याची भाजप व संघाची चाल असून त्यानुसार सर्व खटाटोप सुरू असल्याचेही राहुल यांनी या वेळी म्हटले आहे.

Related posts

अटलजींनी नेहरूंचा हटवलेला फोटो पुन्हा लावायला सांगितला…. आज अटलजींची जयंती !

News Desk

केंद्राने शहाणपणा दाखवावा, अजूनही वेळ गेलेली नाही ! । शरद पवार

News Desk

इंडोनेशियात आता ज्वालामुखीचा उद्रेक

Gauri Tilekar