HW News Marathi
क्राइम

ट्रॅक्टरच्या आमिष व फसवणूकप्रकरणी चेतन भालचंद्र नांदणीकरांना अटक

सांगली | तासगाव पंचायत समितीकडून अनुदानावर कमी किंमतीत ट्रॅक्टर मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी कंत्राटी कामगार चेतन भालचंद्र नांदणीकर याच्या सेवा कमी करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कारवाईचे आदेश काढले आहेत. तसेच, जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी अरुण जाधव यांनी आजच एफआयआर दाखल केला असून, संबंधितास अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती पुढीलप्रमाणे – महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत बाह्यस्थ पद्धतीने मानधन तत्वावर मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्थेमार्फत चेतन भालचंद्र नांदणीकर यांना कंत्राटी तांत्रिक अधिकारी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात आली होती. परंतु चेतन नांदणीकर व अन्य तिघांनी पंचायत समिती तासगाव कडून अनुदानावर कमी किंमतीत ट्रॅक्टर मिळवून देण्याच्या आमिषाने भाऊसाहेब एरंडोले (रा. मणेराजुरी, ता. तासगाव) या शेतकऱ्याकडून पावणे चार लाख रुपये घेऊन फसवणूक केली.

याबाबत चेतन नांदणीकर यांनी केलेला खुलासा समर्पक नसल्याचा अहवाल तासगावचे गटविकास अधिकारी यांनी दिला आहे. त्या अहवालाला अधिन राहून चेतन नांदणीकर यांच्या सेवा कमी करण्यात आल्या आहेत. तसेच , या प्रकरणी फोजदारी कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार गटविकास अधिकारी अरुण जाधव यांनी आजच एफआयआर दाखल केला असून, संबंधितास अटक करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अफगान सरकार झुकले, सत्ता सोपवणार ?

News Desk

तीन दिवसांपूर्वी जॉइन झालेल्या हैदराबादच्या आयटी इंजिनिअरची पुण्यात आत्महत्या

News Desk

सलमान खाननी ‘या’ कारणासाठी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

Aprna