HW News Marathi
क्राइम

नयना पुजारी बलात्कार-हत्या प्रकरणी तिघेजण दोषी

पुणे – महाराष्ट्राला हादरवून सोडणा-या नयना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणात विशेष न्यायाधीश एल.एल येनकर यांनी तीन जणांना सोमवारी दोषी ठरविले. सात वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला.

योगेश अशोक राऊत (वय 24 रा. गोळेगाव, खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय 24, रा. सोळू, खेड), विश्‍वास हिंदूराव कदम (वय 26, रा. दिघी, मूळ रा. सातारा) या आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपी राजेश पांडुरंग चौधरी हा माफीचा साक्षीदार झाला.

आरोपींविरुद्ध अपहरण, बलात्कार, खून करणे, चोरी करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमांनुसार आरोप ठेवण्यात आले होते. चौधरी याचा फौजदारी दंड संहिता कलम 164 नुसार न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदविलेला जबाब, विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी 37 जणांची नोंदविलेली साक्ष, आरोपींविरुद्ध पोलिसांनी सादर केलेला भक्कम परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावा, आरोपी आणि पीडित पुजारी यांना एकत्रित पाहणाऱ्यांची साक्ष अशा मुद्यांच्याआधारे आरोपींनीच हा गुन्हा केल्याचे सिध्द झाले.

ऑक्‍टोबर 2009मध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. पुजारी यांचा मृतदेह राजगुरुनगरजवळील जरेवाडी येथे सापडला होता. त्यांच्या चेहऱ्यावर दगड मारून विद्रूप केला गेला होता. तत्पूर्वी त्यांच्यावर बलात्कार करून गळा आवळून खून केला होता. या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी घटनेनंतर एका आठवड्याच्या आत अटक केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रशियन महिलेची भर रस्त्यात छेडछाड

News Desk

रेल्वेच्या टॉयलेटमध्ये सापडल्या दोन हजार दारुच्या बाटल्या

News Desk

“शेतकऱ्यांच्या मृत्यूवर PM मोदी गप्प का”? – कन्हैया

News Desk