HW News Marathi
क्राइम

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वाशिम जिल्ह्यातील पांगरिकुटे येथील घटना

विनोद तायडे

वाशिम 15 वर्षीय मुलीला लग्नाची आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. सागर नारायण (20) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकऱणी मुलीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रर दिली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरेपीला अटक केली आहे. .

पांगरिकुटे येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची आई लहानपणीच वारल्याने वडिलांनी दुसरे लग्न केले. तेव्हा पासून पीडिता आजी आजोबासोबत राहते. गावातील सागर कुटे वय वर्ष 20 याने 1 वर्षांपासून लग्नाचे आमिष देत मुलीवर बलात्कार करत होता.22 जुलै रोजी सायंकाळी नराधम सागर कुटे याने पीडिताला त्याच्या शेतात बोलावले .शेतातील घरात बलात्कार केला . त्यानंतर तो पुण्याला पळून जात होता हे प्रदीप गवई यांना लक्षात आल्याने त्यांनी आरोपीला पकडून मालेगाव पोलीसाच्या ताब्यात दिले. त्यानंतर पीडितांच्या तक्रारीवरून आरोपी सागर कुटे विरुद्ध बलात्कार, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून आरोपीला अटक केली आहे घटनास्थळाला पोलीस विभागीय अधिकारी किरण धात्रक यांनी भेट दिली पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवसा स्पा सेंटर, रात्री सेक्स रॅकेट…

News Desk

हदगावमध्ये अवैध दारू जप्त , तिघांना अटक

News Desk

आर्यनच्या खान ड्रग्स प्रकरणावर २० ऑक्टोबरला होणार जामीनावर निर्णय

News Desk