HW News Marathi
क्राइम

११ पोलीस अधिका-यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते सन्मानित

उत्तम बाबळे

नांदेड :- विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कार्यालय नांदेड अंतर्गत नांदेड,परभणी,लातूर व हिंगोली जिल्ह्यातील उत्कृष्ट तपास, उत्कृस्ट तंत्रज्ञान अवगत व उत्कृष्ट पैरवी करणा-या अधिका-यां ११ पोलीस अधिका-यांना विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते ८ मे रोजी नांदेड येथे सन्मानित करण्यात आले आहे.

नांदेड परिक्षेत्रातील नांदेड,परभणी,लातूर व हिंगोली जिल्ह्यातील उत्कृष्ट तपास अधिकारी,उत्कृष्ट तंत्रज्ञान अवगत असलेले अधिकारी व उत्कृष्ट पैरवी करणारे अधिकारी अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट पोलीस सेवा बजावणा-या ११ पोलीस अधिका-यांना ८ मे २०१७ रोजी नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते व नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्र किशोर मीणा,अप्पर पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे,लातूरचे राठोड,परभणीचे दिलीप झळके आणि हिंगोलीचे अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यात उत्कृष्ट तंत्रज्ञान अवगत असलेले अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे शाखा नांदेड चे पोलीस निरीक्षक संदिप गुरमे, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पोलिस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक राहूल बहुरे, लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पो.नि डी.जी. गायकवाड, हिंगोली येथील सायबर सेलचे पोलिस उप निरीक्षक विनायक लांबे यांचा समावेश आहे.तर उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून वजिराबाद नांदेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद केशवराव झोटे, परभणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो.नि. एन.ए. चिंचोळकर, लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बी.आर. सोनटक्के, हिंगोली जिल्ह्यातील वसमत पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक जोंधळे यांचा समावेश असून उत्कृष्ट पैरवी करणारे अधिकारी म्हणून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक एम.जे.झडते, परभणी येथील पोलीस उप निरीक्षक नासेर खालेद चाऊस, हिंगोली येथील पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ बोईनवाड यांचा समावेश आहे.

उपरोक्त पोलीस अधिका-यांना सन्मानित करण्यात आल्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड पोलीस विभागातील अनेक अधिकारी व कर्मचा-यांनी त्यांचे अभिनंदन केले असून भावी सेवा कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरींना दाऊदच्या नावाने जिवे मारण्याची धमकी; कार्यालय आणि निवावसस्थानी सुरक्षेत वाढ

Aprna

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाकडून सलमानला मोठा दिलासा

News Desk

मीरा भाईंदरच्या काशीमिरामधून अमली पदार्थ तस्कराकडून 19 लाखांचे मेफेड्रोन (MD) जप्त

Chetan Kirdat