HW News Marathi
मनोरंजन

येशूंच्या जन्मदिनाचे महत्त्व…

ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ बायबलच्या लूक व मत्तय या दोन्ही शुभवर्तमानात (Gospel) मध्ये ख्रिस्तांच्या जन्माची हकीकत वर्णन केली आहे. त्यानुसार त्याचा जन्म जुदेआच्या बेथलेहेम या गावी एका गोठ्यात झाला. संत लूकच्या लेखनातून येशूची आई मारिया आणि वडील योसेफ यांच्या दृष्टिकोनातून बेथलेहेमच्या यात्रेचा वृत्तान्त दिलेला आहे. असे मानले जाते की, या दिवशी देवदूताने त्यांना मसिया म्हणून उद्देशिले व आजूबाजूचे सर्व मेंढपाळ त्यांची स्तुती करत होते. तसेच संत मॅथ्यू यांच्या सुवचनानुसार तीन राजे येशूंना भेटायला आले होते. त्याच लोकांनी येशूला भेटवस्तू दिल्या. येशूंच्या जन्माचा संदेश मिळताच त्यावेळच्या राजा हेरॉडने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. त्यामुळे येशूंचे कुटुंबीय जीव वाचविण्यासाठी इजिप्तला गेले.

रोमन कालगणनेनुसार २५ डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळाचा दिवस आहे. प्रतीकात्मक कारणासाठी भगवान येशू यांनी आपल्या जन्मासाठी हा सर्वात छोटा दिवस निवडला अशी धारणा आहे. प्राचीन धर्मोपदेशक ऑगस्टाईन यांनी नोंदविले आहे की आपल्या पृथ्वीय अनुमानानुसार भगवान येशू सर्वात छोट्या दिवशी जन्माला आले. तरीही त्यामागील उदात्त आशय असा आहे की त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो. त्यामुळे भगवान येशू आपल्यासाठी लीन झाले आणि त्यांनी आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला दाखविला. कारण यानंतरच्या दिवसांमध्ये सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो.

या जन्माच्या स्मरणाचे औचित्य साधून चर्चमध्ये सायंकाळपासून प्रार्थना म्हणण्यात येतात. ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेस आवर्जून उपस्थित राहतात. काही ठिकाणी नाताळ सणापूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जाऊन येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. त्यांना कॅराॅल असे म्हणतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘हाऊसफुल-4’च्या सेटवर महिला ज्युनिअर आर्टिस्टचा विनयभंग

News Desk

जितेंद्र जोशींनी घेतला सचिन कुंडलकरांचा खरपूस समाचार

News Desk

लातुरची शिक्षिका कौन बनगो करोडपतीमध्ये..

News Desk
राजकारण

शिवराज सिंग यांचा राजीनामा, काँग्रेसला सत्तेसाठी मायावतीसह अखिलेशची सात

News Desk

भोपाल | मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सरकार स्थापन होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल आनंदीबेन पटेली यांच्याकडे सोपविला आहे. शिवराज सिंग चौहान राज्यापालाकडे राजनामा सोपविल्यानंतर माध्यमांशी बोलातना म्हटले की, “मी आता स्वातंत्र आहे, मी मुख्यमंत्री पदाचा राजनामा दिला आहे. मध्य प्रदेममध्ये भाजपचा पराभवासाठी मी जबाबदार माझी आहे. मी कमलनाथ यांना विजयी झाल्याचा मला आनंद आहे.”

मध्य प्रदेशमध्ये भाजपला १०९ जागा, काँग्रेसला ११४ जागांनी विजयी मिळाला आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सरकार व्हावी म्हणून मायावतीने काँग्रेला पाठिंबा दिला आहे. मायावती पाठोपाठ आता सपाने देखील काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे अखिलेश यादव यांनी त्यांच्या ट्विटरवरून सांगितले आहे. मायावतीला २ जागा आणि सपाने १ जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिले आहे. यामुळे काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दुपारी १२ वाजता काँग्रेसला भेटीची वेळ मागतली होती. काँग्रेसने या भेटीदरम्यान सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. काँग्रेस नेत्यांनी काल(१२ डिसेंबर) रात्रीच आनंदीबेन पटेल यांच्या भेटीची वेळ मागितली होती.

 

Related posts

HW Exclusive : ईडी, सीबीआय अन् आयटी तपास यंत्रणा पंतप्रधानांच्या बंगल्याबाहेरील शेपूट हलवणार कुत्रे! – भाई जगताप

Aprna

मीच नव्हे तर माझ्यासोबत काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील

News Desk

नितेश राणेंचा गंभीर आरोप,’राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली आणि आता एकनाथ शिंदे…’

News Desk