HW News Marathi
मुंबई

ठाण्यातील चराई येथील शिव आनंद उद्योग संकुलात आग

ठाणे | ठाण्यातील चरई भागातील वंदना सिनेमा रस्त्यावरील शिव आनंद उद्योग संकुलातील दोन गाळ्यांना भीषण आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिव आनंद उद्योग संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग आगली आहे. संकुलमध्ये असलेल्या दोन गाळ्यांना ही आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दल, ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस दाखल झाले आहेत. आगी लगल्याची माहिती मिळताच सर्व गाळे रिकामी करण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईचे रस्ते तातडीने दुरुस्तीसाठी साडेपाच हजार कोटींचा निधी! – मुख्यमंत्री

Aprna

बेस्ट बस मागे घेताना युवतीचा मृत्यू

swarit

अंधेरी पोटनिवडणुकीतील नाराजीच्या चर्चांवर काँग्रेसची प्रतिक्रिया

Manasi Devkar