HW News Marathi
मनोरंजन

#IndianNavyDay : जाणून घ्या… कसे आहे आपले भारतीय नौदल

भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत ही सामील आहे. अण्वस्त्र आव्हानाला तोंड देण्याची क्षमता असलेल्या या आयएनएस अरिहंतची निमिर्ती कलपक्कम येथील ‘इंदिरा गांधी सेंटर फॉर अँटोमिक रिसर्च’ येथे ‘भारतीय नौदल’ आणि ‘संरक्षण संशाधक आणि विकास ऑर्गनायझेशन’ने एकत्रित प्रयत्नांतून करण्यात आली आहे. १९५३ मध्ये हवेत मारा करणारी शस्त्रे आणि इ.स. १९६७ मध्ये पाणबुडय़ा ताफ्यात समाविष्ट झाल्या.

भारतीय नौदलातील युद्धनौकांच्या बांधणी विषयी…

युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच हवा या अनुषंगाने माझगाव गोदी मध्ये १९६६ साली लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. या माध्यमातून आजतागायत ८० युद्धनौकांची बांधणी करण्यात आली आहे. त्यात टेहळणी जहाजांपासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यांच्यासह युद्धनौकांचाही समावेश आहे.

भारतीय नौदलाचा आवाका

अन्य राष्ट्रांच्या विनंतीवरून भारतीय नौदल त्या त्या राष्ट्रांच्या समुद्रसीमेतही तैनात होऊ लागले. इतर राष्ट्रांच्या बंदरांना भेटी, संयुक्त कवायत, प्रशिक्षण व आपत्कालीन मदत याद्वारे मैत्रीचे संबंध बळकट करण्यात आले आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, रशिया, चीन आदी राष्ट्रांबरोबर नौदलाने संयुक्त कवायतींमार्फत ज्ञानाचे आदानप्रदानही केले आहे. इ.स. २००४ मध्ये त्सुनामी संकटात श्रीलंका, इंडोनेशिया आणि मालदीव या देशांना तात्काळ मदतीचा हात दिला.

कशी होते नौदलामध्ये नोकर भरती

एमईआरएस, एनएमईआर आरटी फिसर अ‍ॅप्रॅण्टिसेसस (एए) आणि डायरेक्टर एण्ट्री डिप्लोमा होल्डर्स (डीइडीएच) या पदासाठी दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्टमधील रोजगार समाचार आणि सर्व आघाडीच्या राष्ट्र/ प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली जाते.

नौदल भरती संघटना नौदलाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयामध्ये असणाऱ्या मनुष्यबळ नियोजन आणि भरती संचालनालया अंतर्गत नौदल भरती संघटना काम करते. नौदलामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करण्याची जबादारी या संघटनेवर असते. भारतीय नौदलात खलाशांची भरती वर्षातून दोन वेळा होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील ‘या’ चर्चमध्ये पारंपारिक पद्धतीने साजरा करतात नाताळ

News Desk

Anant Chaturdashi |गणेशोत्सव मंडपासमोर मोटारसायकल हळू चावण्यास सांगितल्याने हत्या

swarit

८ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृति संगीत समारोह

News Desk