HW News Marathi
देश / विदेश

गोहत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशामध्ये हिंसाचार

बुलंदशहर | गोहत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात हिंसक आंदोलन सुरू आहे. यामुळे उत्तर प्रेदशातील बुलंदशहर जिह्ल्यामध्ये हिंसाचार उसळला. यावेळी हिंसक जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला असून मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ केली आहे. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यादरम्यान, हिंसक जमावाने पोलीस स्टेशनवर दगडफेक करीत हल्ला केला. पोलीस स्टेशनबाहेरील पोलिसांची गाडी पेटवून दिली. या हल्ल्यात स्याना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकारानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बुलंदशहर जिल्ह्यातील स्यानामधील एका गावात शेतात गायीचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. यावेळी पोलीस आणि जमावामध्ये वादावादी झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्या जमावावर गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ केली. यात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकारानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच बुलंदशहर येथील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मीरतचे एडीजी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधार कार्डचा दुरुपयोग टाळण्यासाठी केंद्र सरकारने काढले ‘हे’ नवे आदेश; जाणून घ्या…!

Aprna

‘त्या’ नावांची घोषणा राज्यपालांनी लवकरात लवकर करावी, अन्यथा…!

Gauri Tilekar

पोलीस निरीक्षक सुबोध कुमार यांच्या हत्येप्रकरणी संशयित जवानाला अटक

News Desk