HW News Marathi
राजकारण

मर्यादित वेळेनंतर फटाके फोडल्याने मुंबईत २ अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल

मुंबई | सर्वोच्‍च न्यायालयाने ‘रात्री ८ ते १० या मर्यादित वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी’ दिली आहे. तरीही सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही मर्यादित वेळ न पाळता त्या वेळेनंतरही फटाके फोडल्याने काल मध्यरात्री ट्रॉम्बे पोलिसांनी दोन अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री उशिरापर्यंत मानखुर्दच्या काही भागात फटाके फोडण्यात आले होते. मुंबईत हा पहिलाच गुन्हा दाखल झाला असून अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाइन फटाके विक्रीवर पूर्णपणे बंदी लागू केली आहे. त्याचप्रमाणे रात्री ८ ते १० म्हणजे केवळ दोनच तास फटाके फोडण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णायावर अनेकांनी नाराजी वर्तविली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजेंद्र दर्डा यांचा काँग्रेसच्या प्रसारमाध्यम-संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा

News Desk

#LokSabhaElections2019 : उर्मिला मातोंडकर आज काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

News Desk

आदित्य ठाकरे हे राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होणार

Aprna