HW News Marathi
राजकारण

राजेंद्र दर्डा यांचा काँग्रेसच्या प्रसारमाध्यम-संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा

मुंबई | काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी (२३ सप्टेंबर) काँग्रेसच्या प्रसारमाध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी यावेळी सांगितले आहे. राजेंद्र दर्डा यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. दर्डा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसल्याची माहिती मिळत आहे.

राजेंद्र दर्डा हे ‘लोकमत’ या दैनिकाचे मालक आहेत. त्याचप्रमाणे दर्डा हे सलग १५ वर्ष आमदार राहिले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक मंत्रिपदे देखील भूषवली आहेत. मात्र, आता राजेंद्र दर्डा यांनी वैयक्तिक कारण देत त्यांच्या प्रसारमाध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभेनंतर एकूणच अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकामागोमाग एक धक्के पचवावे लागत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ कारणामुळे अनिल परब ED चौकशीला गैरहजर

Aprna

जयदत्त क्षीरसागर करणार आज शिवसेनेत प्रवेश

News Desk

फडणवीस यांच्या काळात राज्य जातीय अराजकतेत

News Desk