HW News Marathi
राजकारण

आदित्य ठाकरे हे राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होणार

मुंबई | देशात भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज 65 वा दिवस आहे. भारत जोडो यात्रा ही काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. राज्यात भारत जोडो यात्रा ही नांदेडमधून सुरू झालेली आहे. राज्यातील भारत जोडो यात्रा ही आज (11 नोव्हेंबर) दुपारी हिंगोलीमध्ये दाखल होणार आहे. यात शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे यात्रेत सहभागी होणार आहे. आदित ठाकरे हे राहुल गांधीसोबत यात्रेत एकत्र चालणार आहे.

 

या यात्रेत गुरुवारी (10 नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे सहभागी झाले होते. काँग्रेसच्या राहुल गांधीला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. राज्यातील यात्रेच्या मार्गावर दोन मोठ्या सभा होणार आहेत. यातील पहिली सभा ही गुरुवारी झाली. तर दुसरी सभा शुक्रवारी (18 नोव्हेंबर) शेगाव येथे होणार आहे.

 

राज्यात काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यातून 384 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. राहुल गांधी हे ऐवढा पायी प्रवास चालणार आहेत.

 

यात्रेचा आजचा असा आहे प्रवास

 • सकाळी. ५.४५ वाजता दाभड पदयात्रा प्रारंभ
 • सकाळी. ६.०० वाजता भोकर फाटा
 • सकाळी. ६.०० वाजता वसमत फाटा
 • सकाळी. ७.०० वाजता तहसील कार्यालय कॉर्नर, अर्धापूर
 • सकाळी. ७.१५ वाजता तामसा कॉर्नर, अर्धापूर
 • सकाळी. ७.३० वाजता बसस्थानक, अर्धापूर
 • सकाळी. ८.३० वाजता पार्डी मक्ता
 • सकाळी. ९.०० वाजता स्वामी फार्म हाऊस, पार्डी मक्ता
 • दुपारी. ३.०० वाजता चोरांबा फाटा पदयात्रा प्रारंभ
 • दुपारी. ३.३० वाजता हिवरा फाटा
 • दुपारी. ३.३० सुमारास हिंगोली जिल्ह्यात प्रवेश

Related posts

रिपब्लिकन कार्यकर्त्यांसाठी सत्तेतील वाटा  मिळवून देणारच | आठवले

News Desk

शोपियान येथील चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही !

News Desk