HW News Marathi
मनोरंजन

जाणून घ्या…कशा कराव्यात मूग-गव्हाच्या खुसखुशीत चकल्या

दिवाळी आली की लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत चकली म्हटली की सगळ्यांच्याच तोंडात पाणी येते. सर्वजण चकलीवर ताव मारतात. आतापर्यंत आपण भाजणीच्या चकल्या खातच आलो आहोत. यावर्षीच्या दिवाळीत भाजणीच्या चकल्यांऐवजी मूग-गव्हाच्या चकल्या बनवून पहा.

साहित्य :-

१ वाटी मूग डाळ

चार वाटी गव्हाचे पीठ

१ टीस्पून तिखट मसाला

१ टीस्पून धण्याची पावडर

१/२ टीस्पून हळद

१ टीस्पून पांढरे तीळ

१/२ टीस्पून ओवा

चवीनुसार मीठ

तळण्यासाठी तेल

कृती:-

सर्वप्रथम मुगाची डाळ स्वछ धुवावी, नंतर एका टोपामध्ये पाणी घेऊन त्यात मुगाची डाळ,थोडी हळद, आणि थोडे हिंग घालून डाळ मऊ शिजून घ्यावी.

रवीच्या साह्याने शिजवलेल्या डाळीची पेस्ट (घुसळ) करावी. त्यांनतर चाळणीच्या साह्याने मऊ पेस्ट करावी,ज्याने डाळीचा कण राहणार नाही.

एका टोपात कॉटनचा कपडा/रुमाल ठेवावा. त्यामध्ये गव्हाचे पीठ काढावे.रुमाल/ कपड्याला गाठ बांधून, कुकरच्या डब्यामध्ये १५ मिनिटे वाफवून घ्यावे.

कुकरची शिट्टी काडून वाफवून घ्यावे. त्यानंतर त्यामधले गट्ठे फोडून घ्यावे.(पीठ गरम असतानाच)

पीठ चाळून घ्यावे, त्यांनतर त्यात तिखट मसाला, तीळ, ओवा, धणे पावडर,चवीपुरते मीठ टाकावे शेवटी त्यात डाळीची पेस्ट हळू हळू घालावी आणि पीठ मळून घ्यावे.गरजेनुसार पाणी घालून,पीठ घट्ट मळावे. पीठ जेवढे घट्ट मळणार तेवढे चकलीला काटे टोकदार येणार,त्यामुळे चकली दिसायला सुंदर दिसते.

पीठ मळून झाल्यांनतर चकली पात्रात पीठ भरून,चकल्या पाडून घ्याव्यात.

एका बाजूला तेल तापवायला ठेवावे, तेल गरम झाल्यावर चकल्या तेलात सोडयावत मंद आचेवर चकल्या तळून घ्याव्यात.

या चकल्या खायला कुरकुरीत लागतात.

टीप :- मूग- गव्हाच्या चकल्या तयार करताना त्यात तेलाचे मोहन घालण्याची गरज नसते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kargil Vijay Diwas : जवानांच्या शौर्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले सलाम

News Desk

रजनीकांतचा ‘बाशा’ चित्रपट २२ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार

News Desk

Gandhi Jayanti : खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून ‘खादी फेस्ट २०१८’चे आयोजन

Gauri Tilekar