HW News Marathi
मनोरंजन

जाणून घ्या… दिवाळीच्या फराळमधील ‘अनारसे’ सोप्या पद्धतीने कसे कराल  

दिवाळीच्या फराळातील सर्वात अवघड असा पदार्थ म्हणजे अनारसे हा आहे. परंतु आम्ही तुम्हाल सहज आणि सोप्या पद्धतीने अनारसे कशा प्रकरे करायचे हे सांगतो. आमच्या पद्धतीने केलेले अनारसे जर तुम्ही केले तर तुमचे कुटुंबी तुमच्यावर नक्की खूश होती. बाजारात मिळणारे अनारसे महाग मिळतात. त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अनारसे बनविले तर आवडीने खाले जातील. आणि तुमचे गोड कौतुक केले जाईल.

साहित्य:

१ कप तांदूळ

१ कप किसलेला गूळ

१ चमचा तूप

खसखस

तळण्यासाठी तूप / तेल

कृती:
  • तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत,प्रत्येक दिवशी पाणी बदलावे.
  • चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे, कपड्यावर घालून कोरडे करून घ्यावेत, मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे नंतर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावे.
  • किसलेला गूळ आणि १ चमचा तूप चाळलेल्या बारीक तांदूळात घालून मळावे. घट्ट मळलेला गोळा ५-६ दिवस डब्यात भरून ठेवावा. प्लास्टिकचा डबा वापरावा किंवा प्लास्टिक पिशवीत भरून प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवावे.
  • ५-६ दिवसांनी हे पिठ बाहेर काढावे. तळण्यासाठी मंद आचेवर तेल / तूप गरम करावे. २-३ छोटे छोटे गोळे करावे,पुरीसारखे लाटावे. पुरी लाटताना खसखशीवर लाटावी. ही पुरी तळताना खसखस असलेला भाग वरती ठेवावा.
  • पुरी तेलात टाकल्यावर फुलते व थोडी पसरट होते त्यामुळे झारा आणि एक स्टीलचा चमचा तेलातील पुरीच्या कडेने धरावा म्हणजे पुरी तुटणार नाही
  • अनारसे तळताना ब‍र्‍याचदा तो फसफसतो. तेव्हा पिठाचा गोळा तसाच ठेवून द्यावा, नंतर वापरावा कारण हे पिठ ५-६ महिने सहज टिकते.
  • अनारसे मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून काढावेत. चाळणीत उभे करून तेल निथळून जाऊ द्यावे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#IndependenceDay | पूरग्रस्तांचे पुनर्वसन लवकरात लवकर करु !

News Desk

अलाहाबादचे नाव बदलून ‘प्रयागराज’ होणार ?

News Desk

इतिहास महाराष्ट्र दिनाचा

swarit