HW Marathi
News दिवाळी 2018

हिंदुजा कॉलेजच्या “मराठी वाङमय मंडळा”ने अशी साजरी केली दिवाळी

मुंबई | चर्णी रोड येथील के.पी.बी हिंदुजा कॉलेज मधील मराठी वाङमय मंडळ हे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात. यावेळी गरींबाबरोबर अनोखी अशी दिवाळी साजरी केली आहे. मराठी वाङमय मंडळाने ६ नोव्हेंबर रोजी म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी यांनी गरिबांना दिवाळी साजरी करण्यासाठी विध्यार्थी पुढे आले. दिवे, कंदील, फराळ, पणत्या, आणि कपडे देऊन गरिबांना देऊन साजरी करण्यात आली आहे.

हा उपक्रमला संध्याकाळी ७ वाजता सुरू करण्यात आला. “सीएसटी पासून ते रे रोड” पर्यंत व “चर्चगेट ते मुंबई सेंट्रल” पर्यंत गोरगरिबांच्या घरोघरी जाऊन हा उपक्रम राबविण्यात आला. विधार्थ्यांनी घरासमोर कंदील व पणत्या लावून दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला. या झोपडी समोर वेगवेगळ्या अप्रतिम रांगोळ्या काढण्यात आल्या.  विद्यार्थांनी या मुलांसोबत सेल्फी घेतल्या असून या मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

विद्यार्थ्यांचे मानले आभार

विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन मुलांना आनंदाची दिवाळी साजरी करायला लावली व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. गरजू मुलांना पैसे पण दिले. यावेळी मुलांच्या तोंडावर वेगळेच गोड स्मिथ हास्य दिसून आले होते. मुलांनी मराठी वाङमय मंडळाच्या विध्यार्थ्यनाचे मानले आभार अशी प्रतिक्रिया गरिब मुलांनी दिली.

आमचा हा पहिला दिवाळीचा अनोखा कार्यक्रम होता.आम्हांला आमच्या शिक्षक वर्गाकडून आम्हाला प्रोत्साहन मिळत असते. श्रीमंत व सामान्य कुटुंब दिवाळी साजरी करत असतात पण “गरीब कुटुंबाकडे पैसे नसल्याने कोठून साजरी दिवाळी”? असा प्रश्न आम्हांला पडला होता म्हणून आम्ही एक अनोखा उपक्रम राबवला.

मराठी वाङमय मंडळ

रोहित महाडीक,ओमकार लायगुडे,नम्रता तळेकर,ओमकार घाडीगांवकर,प्रथमेश परब,शिशिर चव्हाण,कौस्तुभ देशनेहरे,दुर्वा पवार,साक्षी ओमले,भुमिका रायकर,मैथिली शिर्के,पूजा दळवी,शिवानी मालुसरे. आदी विधर्थ्यांनी हा उपक्रम राबवला

Related posts

गोव्यात नरकासुरांच्या पुतळ्याचे दहन करून नरक चतुर्दशी साजरा

अपर्णा गोतपागर

एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या रद्द

Gauri Tilekar

माझ्या आठवणीतील दिवाळी | Nilay Ghaisas

News Desk