HW News Marathi
राजकारण

दिवाळीत ‘या’ मार्केटमध्ये करा खरेदी…

अश्विनी सुतार | दिवाळी अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईकरांची लगबग सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. हल्ली तंत्रज्ञानाच्या युगात प्रसिद्ध शॉपिंग मॉल्स, शॉपिंग मार्केट वेगवेगळी ठिकाणी युट्यूब द्वारे पाहिली जातात. मात्र मुंबईत खरेदी कुठे करायची हा प्रश्न पडला असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.

तोरण आणि कंदील – वेगवेगळ्या प्रकारचे कंदील , तोरण तसेच सजावटीच्या साहित्यासाठी दक्षिण मुंबईत असलेल्या लोहार चाळीला एकदा तरी भेट द्या. लोहार चाळ ही अत्यंत लोकप्रिय मार्केटपैकी एक आहे. तसेच लोहर चाळ ही क्रॉफर्ट मार्केटच्या विरुद्ध दिशेला आहे. तेथे अनेक छोटी मोठी इलेक्ट्रॉनिकची दुकाने आहेत. या ठिकाणी अत्यंत कमी दरात तोरणे आणि कंदील विक्री होते.

शॉपिंग म्हटले की स्ट्रीट शॉपिंग ला खूप मज्जा येते. फॅशन ही स्ट्रीट शॉपिंगसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच यादीत दुसरे नाव म्हणजे दादर मार्केट .दादर पश्चिम येथील कबुतर खाण्याजवळ सुद्धा स्ट्रीट मार्केट आहे. त्याचप्रमाणे नवरात्री आणि दिवाळी अशा हिंदू सणांच्या विविध शॉपिंगसाठी दक्षिण मुंबईत असलेले भुलेश्वर मार्केट सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहेत. फॅशन स्ट्रीट आणि बांद्राचे लिंकिंग रोड हे प्रसिद्ध शॉपिंग सेंटर आहे.

दिवाळीतील मिठाई स्पेशल- जर तुम्हला मोहन थाळ सारखी गुजराती आणि जैन मिठाई आवडत असेल तर अशी ब्रँडेड मिठाई क्रॉफर्ड मार्केट मध्ये उपलब्ध आहे. मालाड रेल्वेस्थानकाच्या समोर एम एम मिठाईवाला , दक्षिण मुंबईत असलेले आदर्श मीठाईवाला, तसेच मुंबईतले विविध मॉल आणि डी मार्ट मिठाईसाठी प्रसिद्ध आहेत.

भेट देण्यासाठी भेट वस्तू- आपल्या जवळच्या आणि प्रियकरांना भेट वस्तू देण्यासाठी दिवाळी हा सण अतिशय योग्य आहे . अश्या भेट वस्तू कमी भावात मंगलदास मार्केट, भुलेश्वर मार्केट , क्रॉफर्ड मार्केट येथे मिळते. फटाके अनेक जण फटाक्यांमध्ये पैसे घालवण्यात इंटरेस्ट नसतात परंतु मुलांच्या हट्टापायी जर फटाके खरेदी करायचे असल्यास दक्षिण मुंबईच्या प्रसिद्ध मोहम्मद अली रोड येथे कमी भावात मिळतात.

दिवाळीचे सजावटीच्या वस्तू- पणत्या, रांगोळी तसेच सजावटीच्या विविध वस्तूशिवाय दिवाळी अपूर्णच आहे .पणत्या आणि रांगोळी कमी भावात खरेदी करण्यासाठी क्रॉफर्ड मार्केट , भुलेश्वर मार्केट मालाडचे नटराज मार्केट , बोरवलीचे एस वी रोड लोकप्रिय आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुन्हा एकदा शेतकऱ्यांना लेखी आश्वसनाचे गाजर ?

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

News Desk

विरोधकांना देशासोबत उभे राहण्यात संकोच वाटतो !

News Desk