HW News Marathi
राजकारण

यंदा दिवाळी काढणार दिवाळ

मुंबई | दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ”आली माझ्या घरी ही दिवाळी” असे आनंदात दिवाळीच प्रत्येक जण स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण यंदाची ही दिवाळी दिवाळ काढणारी आहे. फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या डाळी, रवा-मैदा, कपडे, पणत्या आणि आकाशकंदिलापर्यंत सर्वच गोष्टी १५ ते २० टक्क्यांनी महाग झाल्या आहे. यामुळे यंदाच्या दिवाळीत महागाईमुळे सर्वसामान्यांचे पुरते दिवाळ निघण्याची शक्यता आहे. त्यातच महिन्याच्या सुरुवातीला दिवाळी येत असल्याने महागाईमुळे दिवाळी सण साजरा करायचा कसा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

प्लॅस्टिकबंदीमुळे बाजारात सगळीकडे कागद आणि कापडापासून बनवलेले कंदील बाजारात विक्रीसाठी आले आहे. त्यातच ग्राहकही इको फ्रेंडली कंदिलांची मागणी करताना असल्याने पारंपरिक आकाशकंदीलाकडे ग्राहकांचा चांगलाच ओढा दिसत आहे. या कंदिलाची किंमत ४०० रुपयांपासून सुरु होत असून १५०० रुपयांपर्यत आहे. दिवाळीचे फराळ तयार करण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तेल आणि डालडा दरम्यान यंदा घाऊक बाजारात साखर आणि डाळींच्या तुलनेत तेल आणि डालड्याला सर्वाधिक फटका बसला असून गेल्यावर्षी ९० रुपयांवर असणाऱ्या डालड्याने ११० रुपयांपर्यंत मजल मारली आहे. तर खाद्यतेलाच्या किंमतीही प्रति लिटर १५ ते २० रुपयांंनी महागले असून १ लीटरच्या सनफ्लॉवर तेलासाठी १४० रुपये मोजावे लागत आहे. गेल्यावर्षी याच तेलाची किंमत ११० रुपये प्रतिलीटर होती.

सध्या पेट्रोलपासून घरगुती गॅसपर्यंत सर्व वस्तूंच्या किंमतीत भरमसाठी महागाई झाली आहे. सध्या किराणा मालापासून ते कंदिलापर्यंत प्रत्येक गोष्टीत जवळपास २० टक्क्यांनी दरवाढ झाली असून डाळी व तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. दिवाळीत खरेदीसाठी होणारी गर्दी आणि महागाई टाळण्यासाठी आम्ही दिवाळीच्या खरेदीला काही दिवसांपूर्वीचं सुरूवात करतो. परंतु तरीही अनेकदा खर्च करताना हात थोडा आखडताच घ्यावा लागतोय.

– गीता तावडे, ग्राहक

तेल व डालड्याच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहक रेडिमेड फराळ विकत घेतात. मात्र रेडीमेड फराळाच्या किमतीतीही यंदा २० ते ३० रुपयांनी वाढल्या आहे. या रेडीमड फराळातील चकली ४०० रुपये किलो, चिवडा, शेव, शंकरपाळी ३०० रुपये किलो दराने बाजारात विकल्या जात आहे. त्याशिवाय डाएट चिवड्याच्या २०० ग्रॅमच्या पॅकसाठी ५० रुपये मोजावे लागत असून रवा, बेसन लाडू आणि करंजीच्या एका नगासाठी २२ ते २५ रुपये मोजावे लागत आहेत.

यंदाचे किराणा मालाचे दर पुढीलप्रमाणे –

  • वस्तू – किंमती (प्रतिकिलो)
  • साखर- ४० रुपये
  • चणाडाळ – ७६ रुपये
  • जाडी चणाडाळ- ८० रुपये
  • जाड रवा – ३६ रुपये
  • बारीक रवा – ३६ रुपये
  • पिठीसाखर ४८ रुपये
  • मैदा – ३६ रुपये
  • पातळ पोहे – ६४ रुपये
  • जाड पोहे – ६० रुपये
  • बदाम – ८८० रुपये
  • काजू – १०८० रुपये
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस भाजपला वरचढ ठरणार ?

News Desk

#LokSabhaElections2019 : सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार

News Desk

शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाला धक्का नाही

Aprna