नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांची यंदाची दिवाळी देखील सैनिकांसोबतच साजरी करणार आहेत. पंतप्रधान मोदी यंदा उत्तराखंडातील हर्षिल सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यावेळी मोदींसोबत लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि अन्य सैन्याचे अधिकारी देखील हजर असतील.
Uttarakhand: Prime Minister Narendra Modi arrives in Dehradun; he will celebrate the festival of #Diwali in Kedarnath pic.twitter.com/rAhdGJg1Dd
— ANI (@ANI) November 7, 2018
हर्षिल सीमा ही भारत-चीन सीमारेषेपासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे. यानंतर मोदी केदारनाथचेही दर्शन घेणार आहेत. २०१४मध्ये मोदींनी पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंततर एलओसीवर जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधी गुरेज सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ जाऊन त्यांनी बीएसएफच्या जवानांसोबत दिवाळीचा आनंद लुटला होता. तसेच जवानांच्या शौर्यालाही त्यांनी सलाम केला होता.
Happy #Diwali! May this festival bring happiness, good health and prosperity in everyone’s lives. May the power of good and brightness always prevail!: Prime Minister Narendra Modi. (File pic) pic.twitter.com/Hc9LYRjB7R
— ANI (@ANI) November 7, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.