HW News Marathi
शिक्षण

भोकर सा.बां.वि.कार्यालयात रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी भरवली शाळा

उत्तम बाबळे

नांदेड :- खड्डेमय झालेल्या रस्त्यावरुन बस वाहतूक बंद करण्यात आल्याने मोखंडी ता.उमरी येथील विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळेला जावे लागत आहे.पाऊस व इतर बाबींच्या अडथळाही सतत होत असून परिनामी शैक्षणीक नुकसानास सामोरे जावे लागत असल्याने गलथान कारभार आणि अक्षम्य दुर्लक्ष करणा-या भोकर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयास जबाबदर धरुन रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी दि.२४ जुलै रोजी १०० च्या वर विद्यार्थ्यांनी चक्क सा.बां.वि.कार्यालयातच शाळा भरऊन एका अनोख्या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले.मोखंडी ता.उमरी जि.नांदेड या गावी इयत्ता ५ वी पर्यंतच जि.प.ची शाळा आहे.या कारणाने पुढील शिक्षणासाठी येथील इयत्ता ६ वी ते पदवी शिक्षण घेणा-या जवळपास १५० विद्यार्थ्यांना उमरी,भोकर आदी ठिकाणी जावे लागते.परंतू या गावापासून उमरी व भोकरकडे जाणारा रस्ता खड्डेमय झाला असल्याने राज्य परिवहन महामंडळाने मानव विकास मिशनसह सर्व बसेसची ये जा बंद केली.तसेच उमरी तालुक्यातील याच परिसरातील मोखंडीसह बोथी,तुराटी, बितनाळ, सावरगाव या पाच गावांच्याही रस्त्याची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे.यामुळे खासगी प्रवासी वाहनधारक ही या रस्त्याने वाहतूक करण्यास धजत नाहीत.होणारी ही हेळसांड थांबवावी यासाठी उपरोक्त गावांना माघील जि.प.व पं.स.सार्वत्रिक निवडणूकीवर बहिष्कार टाकला आणि लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे लक्ष वेधले.यावेळी प्रत्येकांनी अनेक आश्वासने दिली.परंतू ती फोल ठरली.आजतागत रस्ते दुरुस्ती करण्यात आली नाही.उपरोक्त गावच्या नागरीकांनी श्रमदान करत गिट्टी,मुरुम टाकून खड्डे बुजविले व परिवहन महामंडळ आगार नियंत्रक भोकर,उमरी यांना पुर्ववत बस सेवा सुरु करावी अशी मागणी केली.यावरुन बससेवेच्या फे-या सुरु करण्यात आल्या परंतू पावसाने बुजविलेले खड्डे पुनश्च जैसे थे झाले.यामुळे बस बंद करण्यात आली व ३ दिवसापुर्वीच आगार नियंत्रकांनी बस सेवेच्या फे-या बंद करत असल्याचे लेखी पत्र मोखंडी येथील विद्यार्थी व नागरीकांना दिले.विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान व हेळसांड होऊ नये आणि खड्डेमय रस्ता त्वरीत दुरुस्त करण्यात यावा म्हणून दि.२४ जुलै २०१७ रोजी सकाळी मोखंडीचे सरपंच चंद्रकांत सुर्यवंशी, चेरमन गंगाधर सुर्यवंशी, गणपत आडे, माधव बनसोडे, दत्ताहरी माने, शेषेराव राठोड यांचेसह जवळपास १०० च्या वर विद्यार्थ्यांनी रस्ता दुरुस्ती मागणीसाठी थेट भोकर सा.बां.विभाग कार्यालय गाठले व सर्वांच्या स्वाक्ष-यांचे निवेदन दिले.एवढ्यावरच ते न थांबता कार्यालयातच जवळपास ३ ते ४ तास चक्क शाळा भरऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाची माहिती कार्यालयीन कर्मचा-यांनी वरीष्ठ अधिका-यांना दिल्यावरुन सा.बां.वि.चे कार्यकारी अभियंता तोटावाड यांनी आंदोलनस्थळी येऊन सर्वांची समजूत काढली व लवकरच तो रस्ता दुरुस्तीचा प्रयत्न करु असे आश्वासन दिले.यामुळे आंदोलन माघे घेण्यात आले असले तरी सर्व शिक्षा अभियान हे केवळ कागदोपत्रीचे न राहता प्रत्यक्ष आमलात येण्यासाठी राज्य शासनानेही अशा गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे बाेलल्या जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामीण विकासात पदविका अभ्यासक्रम

News Desk

“उज्ज्वल नांदेड” अंतर्गत एमपीएससी टॉपर्सचे ५ जुलै रोजी मार्गदर्शन 

News Desk

फोक्सवॅगन इंडियाकडून सिम्बॉयसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना वेंटो कार भेट

News Desk