HW News Marathi
शिक्षण

महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलवर डॉ.अजित गोपछडे यांची नियुक्ती

उत्तम बाबळे

नांदेड :- शासनाच्या वतीने महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलवर डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. गोपछडे हे शहरातील प्रसिध्द बालरोग तज्ज्ञ असून या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर राज्यभरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलवर मराठवाड्याला प्रतिनिधीत्व देतांना शासनाने डॉ. अजित गोपछडे यांना प्रथम पसंती दिली.महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलचा कारभार कायदा व शिस्तीचा अवलंब करुन व्हावा, त्यात अधिक पारदर्शकता यावी तसेच राज्यातील डॉक्टरांचे प्रश्न कायदेशिर व सनदशिर मार्गाने सुटले जावेत, यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील कांही तज्ज्ञ डॉक्टरांची शासनामार्फत महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलवर निवड केली जाते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षण तथा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रमुख पाच डॉक्टरांची महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलवर नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा बुधवारी 2 ऑगस्ट रोजी शासनाच्या वतीने करण्यात आली. यात शासनाने जिल्ह्याचे सुपूत्र तथा प्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे (एमबीबीएस, एम.डी.) यांच्यासह मुंबई येथील डॉ. बकुलेश मेहता (एम.डी.), चंद्रपूर येथील डॉ. मकरंद व्यवहारे, जळगाव येथील अर्थोपेडीक सर्जन डॉ. प्रताप जाधव व नागपूर येथील डॉ. व्यंकी रघुवन यांची महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलवर नियुक्ती केली. सदर नियुक्ती करतांना शासनाने मराठवाड्याचे भूमिपूत्र डॉ. अजित गोपछडे यांना प्रथम पसंती दिली आहे.

महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलवर नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.अजित गोपछडे यांचे ईमा, निमा, आरोग्य भारती, वैद्यकीय विकास मंच, पॅरामेडीकल कॉन्सिल, आयुर्वेद व्यासपिठ, केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, होमिओपॅथी तसेच युनानी आयुर्वेदच्या सर्व संघटनांनी अभिनंदन केले असून राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. गोपछडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फोक्सवॅगन इंडियाकडून सिम्बॉयसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना वेंटो कार भेट

News Desk

सीबीएसईचा निकाल ८३.०१ टक्के 

News Desk

छात्र भारती आक्रमक, एल्फिन्स्टन कॉलेजवर अॅट्रॉसिटी दाखल करणार  

News Desk