HW News Marathi
शिक्षण

प्रतिकुल परिस्थीतीवर मात करून मिळवलं कौतुकास्पद यश

मुंबई | राज्यात दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. अनेक दिवसांत या निकालाच्या तारखांविषयी अनेक अफवा पसरल्या होत्या. दहावीची परीक्षा म्हणजे शालेय जीवनातली अत्यंत महत्वाची परीक्षा समजली जाते. साला बादाप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली तरीही काही गुणवान विद्यार्थी मुलगे सुद्धा चमकले आहेत. ज्यांनी कठीण परिस्थितीवरती मात करीत घवघवीत यश संपादीत केले आहे.विक्रोळी पार्क साईट येथे राहणारा गौरव पारदुले हे त्यांपैकीच एक उदाहरण. कठीण परिस्थितीवर मात करून 90.20% मिळवून शाळेत पहिला येण्याचा पराक्रम गौरवने केला आहे.

गौरव हा विवेक विद्यालय विक्रोळी या प्रशालेचा विद्यार्थी आहे.घरची परिस्थिती अत्यंत बेताची.वडील कारपेन्टरचं काम करतात तर आई छोटी -मोठी काम करून संसाराला हातभार लावते.घरी अभ्यास करायला कोणत्याच सोयी सुविधा उपलब्ध नसताना देखील गौरवने हे यश मेहनतीने अभ्यास करून, तसेच दिवसा अभ्यासाला वेळ मिळत नाही म्हणून रात्रीचे अभ्यासाचे वेळापत्रक बनवून संपादीत केले आहे.

गौरवने असेच यश संपादन करावे, नाव मोठे करावे अशा प्रतिक्रिया देतांना त्याच्या आईला अश्रू अनावर झाले.घेतलेल्या कष्टाचे चीज झाले अशी प्रतिक्रिया गौरवच्या बहीणीने दिली.गौरवला भविष्यात इंजीनीअर व्हायचे आहे.त्यासाठी आणखी जोरदार अभ्यास करणार असल्याचे त्यांने एच डब्लू मराठीशी बोलताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे विद्यापीठाकडून इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द

News Desk

विना अनुदानित दिव्यांग शाळांच्या शिक्षकांचे आमरण उपोषण

News Desk

पोलीस शिपाई भरती

News Desk