HW News Marathi
शिक्षण

सिडनेहॅम महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

मुंबई | दक्षिण मुंबईतील सिडनेहॅम महाविद्यालयात तरुणाईने एक पुढचं पाउल उचलून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. गेल्या बारा वर्षांपासून एन. एस. एस. युनिटद्वारे राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला तरुणाईने यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.’करा रक्तदान मिळवा सर्वश्रेष्ठ दान’ असा संदेश देत महाविद्यालयाने विद्यार्थ्यांद्वारे सामाजिक कार्य घडवून आणले आहे.

एन. एस. एस. युनिटची ६५ मुलं आणि लोकमान्य टिळक सायन रुग्णालयातील १५ डॉक्टरांची टीम कार्यक्रमात होती. संपूर्ण रक्तदान शिबिरात ११८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यापैकी ११५ लोकांनी रक्तदान केलं. रक्तदान शिबिरातील ११५ बॉटल रक्त विद्यार्थ्यांनी सायन रुग्णालयाच्या हवाली केलं.

तसेच यामुळे समाजाला रक्तदानाचे महत्व या उपक्रमाद्वारे नक्कीच समजेल अशी आशा व्यक्त करू शकतो. असे एन. एस. एस. युनिटची विद्यार्थिनी प्रांजल खांडेकर हिने सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रतिकुल परिस्थीतीवर मात करून मिळवलं कौतुकास्पद यश

swarit

व्यवसाय परीक्षेचा अर्ज भरण्याबाबत नांदेड आयटीआयमध्ये प्रशिक्षण                                                                                

News Desk

धनगर समाज सेवा संघ मुंबईच्या वतीने  बाबरवस्ती शाळेत शालेय वस्तूंचे वाटप 

News Desk