HW News Marathi
शिक्षण

परिक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थीनीकडे शिक्षकाने केली शरीरसुखाची मागणी

नाशिक | बारावीच्या परीक्षेत पास करण्यासाठी दोन प्राध्यापकांनी विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिली असून प्रा. सचिन निशिकांत साेनवणे व प्रवीण दादाजी सूर्यवंशी या दाेघांविरुद्ध आडगाव पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. या प्रकाराने महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये महाविद्यालयात अकरावीला वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी उत्तीर्ण हाेत २०१६ मध्ये बारावीत प्रवेश घेतला हाेता. संशयित प्रा. सचिन सोनवणे, प्रा. प्रवीण सूर्यवंशी यांनी वर्गात विद्यार्थ्यांना करिअरबाबत विचारणा करताना प्रत्येकाने कुणाला काय व्हायचे? ते चिठ्ठीत लिहून देण्यास सांगितले. त्याचवेळी चिठ्ठी देतानाच पीडित मुलीच्या हाताला दोघा प्राध्यापकांनी नको तो स्पर्श केला. प्रॅक्टीकल सुरू असताना लज्जा येईल अशा ठिकाणी अंगाला स्पर्श केला. घडलेल्या प्रकारामुळे विद्यार्थीनीला मानसिक धक्का बसल्याने २०१६ पासून तिची महाविद्यालयात जाण्याची मानसिकता होत नव्हती. त्यामुळे ती वारंवार बारावीत नापास होत होती.

चार वर्षांपासून तिने बारावीची परिक्षा देऊनही पास होत नसल्याने कुटुंबीय देखील चिंतेत होते. त्यातच मंगळवारी दोघा संशयित प्राध्यापकांनी पीडितीचे पुन्हा भेट घेऊन तुला बारावी पास व्हायचे असल्यास, एक रात्र आमच्यासोबत झोपल्यास तुझा प्रश्न मिटेल’ या मागणीची आठवण करून दिली. महाविद्यालयात असताना दोघांनी युवतीला आम्ही दिलेल्या प्रपोजलचा विचार केलास का? असा प्रश्न विचारून तिच्याशी अगलट करण्याचा प्रयत्न केला. घडलेल्या या प्रकारामुळे पीडितेला धक्का बसला. तिने घरी जाऊन कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर वडिलांनी पीडितेसह पोलिसात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक सूजर बिजली यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोघा प्राध्यापकांविरोधात गुन्हा दाखल केला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुल्कामुळे  प्रवेश व परीक्षेपासून वंचित ठेवू नये

News Desk

ग्रामीण विकासात पदविका अभ्यासक्रम

News Desk

यशश्रीने गाठले यशशिखर

swarit