HW News Marathi
मनोरंजन

उदयनराजेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

सातारा- खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा उदयनराजे अचानक साताऱ्यात आले. यावेळी हजारो समर्थकांच्या साथीने त्यांनी साताऱ्याच्या रस्त्यावरून चालत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, उदयनराजे आता स्वत: पोलीस ठाण्यात हजर होणार का ? याबाबत सध्या सातारकरांना उत्सुकता लागली आहे.

लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे.

उदयनराजे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण हायकोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता उदयनराजे स्वत: पोलीस ठाण्यात हजर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आले.

पदयात्रेदरम्यान आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे भोसले यांचीही धावती भेट घेत विचारपूस केली. या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून सध्या चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, या पदयात्रेवेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चक्क फटाकेही फोडले. रात्री उशिरा उदयनराजे पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण अद्याप तरी उदयनराजे पोलिसांसमोर हजर झालेले नाहीच. आज ते हजर होण्याची शक्यता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोडी लिपीतून दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या पणत्या

swarit

गेटवेवर नौसेना दिनाची रंगीत तालीम, पहा नौसेनेची थरारक प्रात्यक्षिकं

News Desk

#IndianNavyDay : समुद्री चाच्यांचे जहाज लुटण्याचे ४४ प्रयत्न फसले

News Desk