HW News Marathi
मनोरंजन

मलिष्काला स्वयंसेवी संघटनांचा पाठिंबा

मुंबई: आर.जे. मलिष्का आणि शिवसेना यांच्यात झालेल्या वादात आता मुंबईतल्या एनजीओने उडी घेतली आहे. शनिवारी सकाळी मुंबईत मलिष्काला पाठिंबा देण्यासाठी एक रॅली काढण्यात आली, एवढेच नाही तर रस्त्यावर असलेल्या पोलिसांना बामही भेट देण्यात आला. मुंबईत पाऊस सुरू झाला की रस्त्यावरचे खड्डे पुन्हा पडततात. दरवर्षी हीच समस्या मुंबईकरांना भेडसावते. यामुळे वाहतुकीची कोंडी होणे, अपघात होणे या सगळ्या समस्यांना मुंबईकरांना दरवर्षी तोंड द्यावे लागते. याच सगळ्या प्रकारावर विनोदनिर्मितीच्या रूपातून भाष्य करत आर. जे. मलिष्काने एक गाणं रचले आहे. हे गाणे रचण्यासाठी तिने सोनू, तुझा माज्यावर भरवसा नाही का? या गाण्याचा आधार घेतला. मलिष्काने तयार केलेले गाणे आणि त्याच्या ओळी लोकांच्या चांगल्याच पसंतीला उतरल्या. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत.

दरम्यान, शनिवारी सकाळीच अंधेरीतल्या रस्त्यांवर एनजीओच्या सदस्यांनी खड्ड्यांची पाहणी केली आणि या सगळ्यांनी मलिष्काचा फोटो असलेले मास्क लावले होते. तसंच या सगळ्याच आंदोलकांनी वाहतूक पोलिसांना बाम भेट म्हणून दिले. या सगळ्यामुळे मुंबई महापालिकेचा तिळपापड झाला असला तरीही भाजपने मलिष्काला साथ दिली आहे. मलिष्कानं ज्या खुबीने मुंबईकरांची समस्या लोकांच्या समोर आणली त्यासाठी तिची स्तुती करावी तेवढी थोडी आहे असे आशिष शेलार यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता मलिष्का प्रकरणावरूनही शिवसेना आणि भाजप यांच्यात सुंदोपसंदी रंगणार का? अशीही एक चर्चा रंगताना दिसते आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेहरुंच्या व्हायरल फोटोमागचे काय आहे सत्य…

News Desk

जे खोटे आहे ते खोटेच आहे

Gauri Tilekar

जाणून घ्या, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या चित्रपटाचे किती होते मानधन

News Desk