HW News Marathi
मनोरंजन

प्रद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनावर टांगती तलवार   

– चित्रपट प्रदर्शित झाल्यास वर्षा बंगल्यावर मोर्चा

– राजपूत समाजाने दिला सरकारला इशारा

मुंबई – पद्मावती सिनेमा तयार करताना राजपूतांचा अपमना केला असून दिग्दर्शक संजयलिला बन्साली यांनी इतिहासाशी छेडछाड करून सिनेमा बनवला असल्याचा आरोप राजपूत महामोर्चाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे हा सिनेमाच प्रदर्शित करू नका अशी भूमिका राजपूत समाजाने घेतली आहे. जर हा सिनेमा प्रदर्शित झाला तर १७ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला जाईल असा इशारा समाजाने दिला आहे. या बाबत आज राजपूत महामोर्चाच्या वतीने पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. शिवाय प्रत्येक पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यात जावून निवेदन देणार असल्याचे महामोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

पद्मावती सिनेमाच्या माध्यमातून चुकीचा इतिहास समोर आणला जात आहे. त्यामुळे या सिनेमातील सीन्स कट करून चालणार नाही तर या सिनेमावरच बंदी आणा. तो प्रदर्शित होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. जर सिनेमा प्रदर्शित झाला तर राजपूत समाजाच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल असेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान या बाबत सेन्सॉर बोर्ड बरोबर बोलले जाईल, शिवाय चित्रपत प्रदर्शित करू नये अशी मागणीही केले जाईल असे आश्वासन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी राजपूत महामोर्चाच्या शिष्ठमंडळाला दिले. मुख्यमंत्रीही या प्रकरणात लक्ष घालतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लातुरची शिक्षिका कौन बनगो करोडपतीमध्ये..

News Desk

जावेद अख्तर यांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक

News Desk

शाहरुख खाननी महाराष्ट्रातील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना अशी केली मदत

News Desk