HW Marathi
मनोरंजन

 प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात

पुणे | प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे-सोलापूर रोडवर अपघात झाला. या अपघातात आनंद शिंदे थोडक्यात बचावले असून आनंद शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे. आनंद शिंदे यांच्यासह ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे -सोलापूर रोडवरील वरकुटे फाटा येथे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र या आपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, गायक आनंद शिंदे हे रात्री पुण्याहून सोलापूरला तवेरा गाडीने जात होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास इंदापूरजवळील वरकुटे फाटा येथे यांच्या गाडीच्या चालकाला पुढे जाणारा डंपर दिसला नाही. चालकाने डंपरला पाठीमागून धडक दिली. त्यात आनंद शिंदे यांच्या पायाला मुका मार लागला आहे. त्यांच्यावर इंदापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर ते पुण्याला परतले.

Related posts

मी आयपीएलमध्ये सट्टा लावला | अरबाज खान

News Desk

अभिनेत्री गीता कपूर यांचे निधन

News Desk

आता हिंदीतील हसवणूक पुन्हा सुरु

News Desk