HW Marathi
मनोरंजन

अभिनेता सैयद बदरुल हसन खान बहादुर यांचे निधन

मुंबई | हिंदी चित्रपटसृष्टीत पप्पू पॉलिस्टरच्या नावाने प्रसिद्ध असलेले विनोदवीर सैयद बदरुल हसन खान बहादूर यांचे आज (५ फेब्रुवारी) निधन झाले आहे. द स्वॉर्ड ऑफ टीपू सुलतान’ या मालिकेतील मैसूर महाराजाच्या भूमिकेमुळे ते प्रकाशझोतात आले होते. पप्पू पॉलिस्टर यांनी दरमियान: इन बिच (१९९७), इत्तेफाक (२००१) आणि धुंध: द फॉग (२००३) या प्रसिद्ध सिनेमांत काम केले होते.

गेल्या २५ वर्षांपासून मालिका, चित्रपट, रंगभूमी व जाहिरात या माध्यमांत त्यांनी काम केले होते. आपल्या अभिनय शैलीने त्यांनी स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. हिंदी व्यतिरिक्त उर्दू, पारसी, अरबी, पंजाबी, इंग्रजी, अवधी व भोजपूरी भाषा त्यांना अवगत होती. ते अभिनेत्या व्यतिरिक्त शास्त्रीय नर्तकही होते.

खान बहादूर यांना सर्वोत्कृष्ट शास्त्रीय नृत्यासाठी बिरजू महाराज यांच्याकडून पुरस्कारही मिळाला होता. पप्पू पॉलिस्टर यांनी जोधा अकबर, फिर भी दिल है हिंदुस्तानी, मान, खोया खोया चाँद, फरिश्ते, महाराजा, फूल और अंगार, तेरे मेरे सपने, बादल, अन्धा इंतेकाम, तुमसे अच्छा कौन, श्रीमती श्रीमती, आफ मुझे अच्‍छे लगने लगे आणि हीरो हिंदुस्तान यांसारख्या चित्रपटात काम केले होते.

Related posts

#HappyBirthdayLataDi | लतादीदी आयुष्यभर का राहिल्या अविवाहित ?

News Desk

मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांच्या निर्लज्जपणाचा तीव्र निषेध करतो !

News Desk

निवेदिता सराफ दिसणार ‘केसरीनंदन’ या मालिकेत

News Desk