HW Marathi
मनोरंजन

‘झीरो’च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई । अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘झीरो’च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.अमृतपाल सिंग खालसा यांनी ही याचिका दाखल केली आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये शाहरुखने किरपान धारण केल्याने शीख समुदाय नाराज आहेत. ते आक्षेपार्ह दृश्य सिनेमातून हटविण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

किंग खानचा ‘झिरो’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी(२ ऑक्टोबर) रिलीज झाला आहे. २१ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दिल्लीमधील अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिर्सा यांनी अभिनेता शाहरुख खान विरोधात गुन्हा दाखल केला आहे. किरपान हे शीख धर्मियांमध्ये पवित्र मानले जात असून शीख धर्मिय ते धारण करतात. मात्र,या पोस्टरमुळे शीख धर्मियांच्या भावना दुखविल्या आहेत. अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या कचाड्यात सापडला आहे.

Related posts

#MeToo: सुभाष घई यांच्यावर गंभीर आरोप

News Desk

रणवीर दीपीका करणार ‘या’ दिवशी लग्न!

News Desk

निवेदिता सराफ दिसणार ‘केसरीनंदन’ या मालिकेत

News Desk