HW News Marathi
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला ‘हाय ग्रेड कॅन्सर’

मुंबई | बॉलीवूडमध्ये दिवसेंदिवस कॅन्सरची समस्या वाढतांना दिसून येत आहे. अभिनेता इरफान खाननंतर प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला देखील कॅन्सर असल्याचे समोर आले आहे. ट्विटरच्या माध्यमातून तिने स्वत: ही धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोनालीवर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिअॅलिटी शोमध्ये ती परीक्षक होती. मात्र वैयक्तिक कारण सांगत सोनालीने हा शो अर्ध्यावरच सोडला होता.

ट्विटरवरील भावनिक पोस्टमध्ये तिने लिहिलं की, ‘कधी कधी तुम्हाला काही गोष्टींची कुणकुण लागते आणि अनपेक्षितपणे तुमच्या आयुष्यात बदल होतो. मला ‘हाय ग्रेड कॅन्सर’ असल्याचं निदान झालं आहे. सतत वेदना जाणवत असल्याने काही चाचण्या केल्या आणि त्यातून कॅन्सर झाल्याचं अनपेक्षितपणे निदान झालं. माझे कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींनी खूप साथ दिली आहे. त्या सर्वांचे मी आभार मानते.’

‘डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी त्यावर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या मार्गातील प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्यास मी सज्ज आहे. यात गेल्या काही दिवसांपासून लोकांकडून मला मिळत असलेल्या प्रेमाची फार मदत होत आहे. कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने मी ही लढाई लढण्यास सज्ज आहे.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पायल रोहतगीचे शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्वीटनंतर माफी, म्हणे भारतात स्वातंत्र्यच नाही

News Desk

ती एक प्रवाहिका.. काशीबाई कानिटकर

News Desk

मिस इंडिया २०१८ स्पर्धेत मुंबईतील महिलेने मारली बाजी

News Desk