HW News Marathi
मनोरंजन

आता वेब सिरीजवर सुद्धा सेन्सॉरशिपची नजर

नागपूर । सिनेमावर आता पर्यंत सेन्सॉरशिप लावली जाते. परंतु आता भारतात तर वेब सिरीजचा ट्रेड सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. नवनवीन वेबसाईट आता लॉन्च होत आहेत. या वेबसाईटच्या मालिकांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावले जात नव्हते. त्यामुळे वेब मालिकांवर अश्लील व अभद्र सवांद खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे सर्व भारतीय संस्कृतीत बसत नाही. याचा विपरीत परिणाम भारतीय संस्कृतीवर होत असल्याची याचिका नागपूरच्या खंडपीठामध्ये सादर केली.

न्यायधीश भूषणधर्माधिकारी व न्यायाधीश मुरलीधर गिटकर काल (५ ऑक्टोबर) रोजी गृह विभाग,केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, विधी व न्याय विभाग तसेच पोलिसांना देखील नोटीस पाठवली असून त्याचे उत्तर दाखल करण्याची वेळ ३१ ऑक्टोबर पर्यंत दिली गेली आहे. ही याचिका ऍड. दिव्या गोटीया यांनी दाखल केली आहे.सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या वेबसाईट नेटफिल्क्स, अँझोने प्राईम,एएलटी बालाजी, यु ट्यूब या वेबसाईटवरील नवीन मालिका येत आहेत. युवा पिढी या मालिकांमध्ये आकर्षित झालेली आपल्यला दिसून येते.

युवा पिढीच्या मानसिकतेवर सुद्धा याचा वाईट परिणाम होऊ शकतो. या मालिकांना सेन्सॉरशिप नसल्यामुळे अश्लील संवाद, नग्नता अश्या प्रकारचे चित्रीकरण केले आहे. राजकीय लोकांवर शिवीगाळ करतानाही दाखवण्यात येते. लोकांच्या धार्मिक भावना भडकवल्या जातात.यामुळे वेब सिरीजवरती सुद्धा आता सेन्सॉरशिप लावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्वांचे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘आम्ही बेफिकर’चे टीजर पोस्टर लाँच

News Desk

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Aprna

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान यांचे निधन

News Desk
मुंबई

लोअर परळ पुलावरुन सेना-मनसे आमने-सामने

News Desk

मुंबई | लोअर परळचा रेल्वे पुलाच्या पाहणीवरून शिवसेना-मनसे कार्यकर्त्ये आमने-सामने आले. दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी पालिका आयुक्त, रेल्वे अधिकारी आणि शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे कार्यकर्ते आले होते. यावेळी मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी त्यांच्या कार्यकर्ते दाखल झाले.

या पाहाणी दरम्यान मनसेने घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेने लावला आहे. हा पूल २४ जुलैपासून दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे. हा वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांना चालवण्यासाठी बंद केला आहे. या पुलाच्या पाहणीवरून शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते भिडले. पोलिसांनी वेळीस मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केले.

गेले दोन दिवस लोअर परळ स्टेशनजवळील पुलाच्या दुरुस्तीबाबत बंद करण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईकरांचे आतोनात हाल होत आहे. कोणताही पूर्वसूचना व पर्यायी नियोजन न करता हा पूल बंद केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आहे.

Related posts

ठाण्यात सॅटिक पुलावर दोन बसची धडक

News Desk

लोअर परळचा पूल आजपासून बंद, चाकरमान्यांचे हाल

News Desk

पुण्यासाठी शिवसेनेचा वचननामा

News Desk