HW News Marathi
मनोरंजन

यशवंत देव यांच्या निधनाने संगीत विश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावले | तावडे

मुंबई | “मराठी भावसंगीतावर ‘शतदा प्रेम’ करायला लावणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार, गायक, कवी, गीतकार पं. यशवंत देव यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावले आहे. संगीत विश्वात आपल्या कर्तृत्वाने महत्वाचे स्थान निर्माण करणाऱ्या यशवंत देव यांच्या निधनाने संगीत विश्वाची मोठी हानी झाली आहे”, या शब्दांत सांस्कृतिक कायमंत्री विनोद तावडे यांनी यशवंत देव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, भातुकलीच्या खेळामधील राजा आणिक राणी, कुठे शोधिसी रामेश्वर’ अशी एकापेक्षा एक दर्जेदार गाणी यशवंत देव यांनी संगीतबध्द केली आहेत. देव यांनी गेली अनेक दशके संगीत विश्वाला समृध्द केले आहे. संगीतकार यशवंत देव यांना राज्य शासनाच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गदिमा यांच्यासह अनेक सन्मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

FLASHBACK 2018 : सहा महिलांची ‘नाविका सागर परिक्रमा’

News Desk

Mahatma Gandhi Death Anniversary | महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर काय म्हणाले पंडित नेहरू ?

News Desk

ख्रिसमस ट्री नक्की का सजवला जातो !

News Desk