HW News Marathi
मनोरंजन

डॉन समीर धर्माधिकारी

मुंबई | अभिनेता समीर धर्माधिकारी यांनी आपल्या देखण्या व्यक्तिमत्वासोबतच आपल्या विविधांगी भूमिकांनी आजवर आपली वेगळी छाप उमटवली आहे. ‘तू तिथे असावे’या आगामी मराठी चित्रपटात समीर यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘बाबा भाई’ या ‘डॉन’ ची भूमिका समीर यांनी चित्रपटात साकारली आहे. यात समीर धर्माधिकारी यांचा रावडी लूक पहायला मिळतोय. ‘जी कुमार पाटील एंटरटेण्मेंट’ ची प्रस्तुती असलेल्या ‘तू तिथे असावे’ हा चित्रपट येत्या ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

ही भूमिका साकारण्यासाठी समीर यांनी चांगलीच मेहनत घेतली आहे. या भूमिकेबद्दल बोलताना समीर सांगतात की, यात मी साकारलेला डॉन हा ‘चांगल्याशी चांगला तर वाईटाशी वाईट’ असा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, फेशियल एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका साकारल्याचे ते सांगतात.

या चित्रपटात समीर यांच्यासोबत भूषण प्रधान, पल्लवी पाटील, मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, मास्टर तेजस पाटील, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे हे कलाकार आहेत.

‘तू तिथे असावे’ या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. आकाश कांडुरवार, शरद अनिल शर्मा, प्रशांतजी ढोमणे, सुरभी बुजाडे हे सह-निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. मंदार चोळकर, डॉ.श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव या गीतकारांनी लिहिलेल्या गीतांना दिनेश अर्जुना यांचे संगीत लाभले आहे. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत आणि गजानन फुलारी यांचे आहे. रोहितोष सरदारे कार्यकारी निर्माते आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पूनम पांडेच्या साडीतील लूकमुळे चाहते थक्क

News Desk

लक्ष्मीकांत-प्रिया यांची हिट केमिस्ट्री

News Desk

आलोकनाथ यांना अटकपूर्व जामीन मंजूर

News Desk
मनोरंजन

…हे नवीन गाणे ट्रेंड स्थापित करण्यास सज्ज

News Desk

मुंबई | दिवाळी हा वर्षाचा, अपार आनंदाचा पवित्र सण साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येत असते. या आनंदामध्ये यंदा भर पडली ती मुंबई पुणे मुंबई-३या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्याच्या घराघरातील आगमनाने. हे अगदी वेगळ्या शैलीचे गाणे जेवढे कर्णमधून आहे तेवढेच कुटुंबवत्सल आहे.

यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित केले. यावेळी संपूर्ण कलाकार चमू आणि या चित्रपटाची हिट जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे उपस्थित होती. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला गेला आहे. पाच वर्षांपूर्वी आलेल्या मुंबई पुणे मुंबईया चित्रपटाचा हा तिसरा भाग प्रदर्शित होत असून अशा पद्धतीने तीन भागात प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. मुंबई पुणे मुंबई-३च्या माध्यमातून स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे साकारात असलेल्या जोडीच्या आयुष्यातील महत्वाचा तिसरा टप्पा प्रेक्षकांसमोर येणार आहे. इतर कोणत्याही जोडीच्या आयुष्यात असतात तसेच टप्पे या जोडीच्या आयुष्यात असल्याने ही जोडी आणि त्यांची कथा पुन्हा एकदा घराघरात पोहोचणार आहे. हे गाणे पारंपारिक डोहाळजेवण (आता त्याला बेबी शॉवर असेही म्हणतात) समारंभातील असून ते चित्रपट ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाल्यावर घराघरात पोहोचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

आई तू बाबा मी होणार गं…कुणी येणार गंहे गाणे हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, सई टेंभेकर, जयदीप बागवाडकर, वर्षा भावे,योगिता गोडबोले आणि मंदार आपटे यांनी गायले आहे. या गाण्याला संपूर्ण नवा साज असून कानाला भावेल असे संगीत निलेश मोहरीर यांनी दिले आहे. देवयानी कर्वे-कोठारी आणि पल्लवी राजवाडे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले, “डोहाळ जेवण ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात साजरी होणारी एक जुनी परंपरा आहे. हल्ली त्याला बेबी शॉवरम्हटले जाते. हे गाणे एमपीएम-३ या तंत्रावर संपूर्णतः वेगळ्या पद्धतीने साकारले आहे. या गाण्यामध्ये जो खेळ खेळला गेला आहे, तो आम्ही राजवाडे कुटुंब कार्यक्रमासाठी एकत्र आलो की खेळत असू. मोठ्या एकत्र कुटुंबात हे अशाप्रकारे समारंभ साजरे करायला खूप मजा येते. माझी खात्री आहे कि हे गाणे एक नवीन ट्रेंड सुरु करेल. या गाण्याच्या सहजसाधेपणामुळे हे गाणे पटकन ओठांवर रेंगाळते आणि लक्षात राहते.

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आणि त्याला मराठी चित्रपट रसिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसादही लाभतो आहे.

मुंबई पुणे मुंबईच्या पहिल्या दोन भागांना मिळालेला प्रतिसाद तिसऱ्या भागातही पुनरुक्त होईल, असा विश्वास निर्माते संजय छाब्रिया आणि सहनिर्माते व ‘52 फ्रायडे सिनेमाजचे अमित भानुशाली तसेच दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी व्यक्त केला. या चित्रपटाच्या उच्च निर्मितीमूल्यांमुळेच हा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या नावावर अनेक हिट मराठी चित्रपटांची नोंद आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइम प्लीज, मुंबई पुणे मुंबई-२, बापजन्म आणि आम्ही दोघी यांसारख्या चित्रपटांची निर्मिती आणि त्यांचे सादरीकरण कंपनीने केले आहे.

Related posts

किंग खानने घेतली दिलीप कुमार यांची भेट

News Desk

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक; स्नेही राजेश दामलेंची माहिती

Aprna

किंग खानच्या ‘झीरो’ सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील

News Desk