HW News Marathi
मनोरंजन

डॉ. मशहुर गुलाटीला स्वाइन फ्लू

मुंबई- कपील शर्मासोबत गुत्थी तसेच डॉ. गुलाटी यांच्या भूमिका निभावणार कलावंत सुनील ग्रोवरला डेंग्युची लागन झाली आहे. त्याच्यावर मुंबईच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सुनील ग्रोवर गेल्या तीन दिवसांपासून तापेने फणफणला होता. त्यामुळे त्याच्या रक्ताची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याला डेंग्युची लागन झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनील ग्रोवर याच्या अफलातून कलाकारीमुळे कपिलचा कॉमेडी शोने मोठी उंची गाठली होती. परंतु कपिलसोबत त्याचा वाद झाल्यानंतर त्याने हा शो सोडला होता. त्याचे इतर वाहिन्यांवर शो सुरू आहेत. परंतु सध्या तो आजारी पडल्याने या शोमध्ये खंड पडण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अलाहाबादचे नाव बदलून ‘प्रयागराज’ होणार ?

News Desk

१४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला ‘माऊली’

News Desk

तनुश्री दत्ताने राखी सावंतवर ठोकला मानहानीचा दावा

Gauri Tilekar