HW News Marathi
मनोरंजन

अनुभव घ्या कथ्थक कलेमधून भारताच्या वैभवशाली अभंगाचा

ठाणे | सरिता कालेले प्रस्तुत आणि मेराकी इन्टोस इन्फ्राटेक आयोजित “इंद्रायणी काठी” कार्यकम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. हा कार्यक्रम शनिवार दिनांक २२ डिसेंबर २०१८ रोजी काशिनाथ घाणेकर सभागृह ठाणे येथे संपन्न होणार आहे. अभंग हा प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला काव्यप्रकार आहे. आता पर्यत विविध माध्यमातून नृत्य आपण पहिले आहे. पण भारतीय संस्कुतीचे जतन करून ही वैभवशाली परंपरा एका वेगळ्या माध्यमातून लोकांपुढे आणण्याचा हा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाला मनोज देसाई यांचा आवाज लाभणार आहे. तबला वादक म्हणून सत्यप्रकाश मिश्रा आणि सतार वादिका अलका गुजर आदि मान्यवर कार्यक्रमाला लाभणार आहेत.

आज पर्यत आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी अभंग या कलेचा वापर केला जात होता. सरिता कालेले आणि कविता देशपांडे यांच्या या उपक्रमामधून कथ्थक या नृत्य प्रकारातून अभंगाची ओळख नव्याने नवीन पिढीला होणार आहे. त्याच प्रमाणे नवीन तरुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरिता हा उपक्रम केला जाता आहे. तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रम उपस्थिती दाखवावी असे आव्हान आयोजक मेराकी इन्टोस इन्फ्राटेक यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास

Aprna

Kargil Vijay Diwas : जाणून घ्या… कारगिल युद्धाची कारणे

News Desk

KumbhMela 2019 : कुंभमेळ्यात पुन्हा एकदा आग

News Desk