HW News Marathi
मनोरंजन

बिग बींना ७६व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा….

मुंबई | बिग बी म्हणून ओळखले जाणारे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज ७६ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा महानायक मानले जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी तसेच कलाविश्वातील अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीर कपूर, रजनीकांत, विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडूलकर या दिग्गजांनीदेखील बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.

बिग बींनी आपल्या चाहत्यांसाठी ट्विट करून आभार व्यक्त केले आहेत. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जातात. कारण कुठलीही भूमिका साकारणे त्यांच्यासाठी अवघड नाही. अगदी बेमालूमपणे ते कुठल्याही भूमिकेत शिरतात आणि ती भूमिका अक्षरश: जिवंत करतात. भारतीय चित्रपटातील ‘अॅग्री यंग मॅन’ अशी ओळख मिळविलेल्या अमिताभ बच्चन यांनी १९७० मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. अमिताभ बच्‍चन यांचा दमदार आवाज आणि डायलॉग्‍जने तमाम सिनेसृष्‍टीला भुरळ घातली आहे. या वयातही अमिताभ तरुण आणि स्टार अभिनेत्यांना लाजवतील अशा उत्साहाने काम करीत आहेत. तसेच कित्‍येक वर्षे लोटली तरी चित्रपटांतील त्‍यांचे कित्‍येक संवाद चाहत्‍यांच्‍या मनात आजही घर करून आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Mahatma Gandhi Death Anniversary | महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर काय म्हणाले पंडित नेहरू ?

News Desk

चॉकलेट गिफ्टवाली दिवाळी

swarit

संदीप कुलकर्णी आता निर्मात्याच्या भूमिकेत

News Desk
महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पक्का, पहा कुणाची खुर्ची आहे धोक्यात ?

News Desk

मुंबई | महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर पक्का झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. १२ किंवा १३ ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे . राज्य मंत्री मंडळाच्या या विस्तारामुळे अनेक मंत्र्यांच्या खूर्चीला धक्का पोहचणार असल्याची चर्चा आहे.

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, या मंत्र्यांची खुर्ची धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. तसेच आमदार आशीष शेलार, आमदार संजय कुंटे, आमदार अनिल बोंडे आणि आमदार भाई गिरकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

सध्या मंत्रिमंडळात भाजप कोट्याच्या चार जागा खाली असून शिवसेनेच्या कोट्यामधील सर्व जागा भरलेल्या आहेत. मात्र शिवसेनेच्या कोट्यातले आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची विधान परिषदेची मुदत संपत असल्यामुळे शिवसेनेकडे एक जागा राहणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे याठिकाणी कुणाची वर्णी लागते हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related posts

आधी लाचखोर नवऱ्याची बायको,नंतर मांजरीची उपमा, महेबूब शेख यांचा चित्रा वाघांवर पुन्हा पलटवार !

News Desk

राज्यात कमाल तापमानात वाढ, मुंबईकर हैराण

News Desk

काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रज्ञा सातव भावूक!

News Desk