HW Marathi
मनोरंजन

राम मंदिरापेक्षा गरीबाच्या पोटात दोन घास जाणे महत्वाचे | नाना पाटेकर

पुणे | देशभरात राममंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना अभिनेते नाना पाटेकर यांनीही राम मंदिराबाबत भाष्य केले आहे. “राममंदिराच्या निर्मितीपेक्षा गरीब माणसाच्या तोंडात रोज दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखे वाटेल. त्यामुळे तुम्हाला मंदिर बांधायचे असेल तर बांधा पण मला जे काम करायचे आहे मी करत आहे,” असे मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे.
राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग आणि ग्रीन थंब या संस्थेच्या माध्यमातून खडकवासला बॅकवॉटरमधील गाळ साफ करण्याच्या चौथ्या टप्प्याच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. तसेच खडकवासला बॅकवॉटरमधील गाळ साफ करण्यासाठी नाम फाऊंडेशनकडून ५ पोकलनची मदत या उपक्रमासाठी देण्यात आली.
देशभरातील शेतकऱ्यांनी काढलेल्या किसान मोर्चावरही नाना पाटेकरांनी यावेळी भाष्य केले. “गरजा पूर्ण होत नाहीत त्यावेळी असे मोर्चे निघतात. शेतकऱ्यांच्या गरजा, अपेक्षा पूर्ण होत नसतील, म्हणून हे मोर्चे निघत आहेत. त्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. एकटे सरकारही सगळ्या गोष्टी पूर्ण करु शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा” असे मत नानांनी व्यक्त केले.

Related posts

‘ठाकरे’च्या सिनेमाचे आज ट्रेलर लाँच

News Desk

‘कट कट’ करूनही त्यांचा ‘किस’ थांबेना!

News Desk

व्ही. शांताराम भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह

News Desk