HW News Marathi
मनोरंजन

जितेंद्र जोशींनी घेतला सचिन कुंडलकरांचा खरपूस समाचार

मुंबई | जेष्ठ अभिनेता विजय चव्हाण यांचे निधन झाले. विजू मामांच्या जाण्याने संपुर्ण मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात होती. सोशल मीडीयावर विजू मामाच्या आठवणी सांगणून श्रद्धांजली वाहिली, तर कोणी मावशीच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीतील एक तारा निखळला असे म्हणात आपल्या भावना व्यकत करत होते. दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी मात्र त्यांच्या फेसबुकवर पोस्टमुळे वादला तोंड फुटले. कुंडलकरांच्या विवादीत पोस्टला अभिनेता जितेंद्र जोशी यांनी फेसबुकवर पोस्ट करून खरपूस समाचार घेतला.

कुंडलकर यांनी फेसबुक पोस्टवर नेमके काय म्हटेल

मराठी रंगभूमीवरील सर्व कलाकार तुमचे मामा आणि मावशी कसे असू शकतात ? आणि प्रत्येक आठवड्यात कोणीतरी मामा-मावशीच्या निधनाने रंगभूमी कशी पोरकी होते?. जेव्हा रंगभूमीवरील सध्या मामा आणि मावशींचे निधन होईल. तेव्हा उमेश कामत मामा असेल तर स्पृहा आत्या असेल? सई तुमची मावशी असेल? यानंतर अमेय वाघ मामा आणि पर्ण पेठे मावशी ? रंगभूमी पोरकी झाली हे खूपच रटाळ वाक्य आहे. अशा विवादीत पोस्ट दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी टाकली आहे.

जिंतेद्र जोशीचा खरपूर समाचार

 

विजय चव्हाण यांना आम्ही “मामा” म्हटलेलं तुम्हाला चालत नाही परंतु सुमित्रा भावेंना तुम्ही एकेरी नावाने हाक न मारता “मावशी” म्हणता आणि महेश एलकुंचवारांचा उल्लेख महेश”दा” असा करता . बरं कसंय ना कि हे आम्हाला लहानपणापासून शिकवलंय आमच्या घरच्यांनी ज्याला आम्ही संस्कार असं म्हणतो त्यानुसार आमच्या घरी कामाला येणाऱ्या बाईला सुद्धा मावशी आणि रिक्शा टॅक्सी वाल्या वयस्कर गृहस्थाला अत्यंत सहजतेने काका/मामा म्हणतो आणि हे कुणीतरी बळजबरी केली म्हणून नव्हे तर तसा भाव आमच्या मनात प्रकट होतो आपोआप . तुम्ही अभ्यासू आणि होऊ घेतलेले विचारवंत आहात म्हणून आणखी खोलात जाऊन् याचा विचार केल्यास असे लक्षात येते की “बाप राखुमादेवीवरु ” असं म्हणणाऱ्या ज्ञानोबारायांना आम्ही “माऊली” म्हणतो . साधी मुक्ताबाई परंतु आमच्या तोडून् “मुक्ताई” म्हणत त्या भावंडांच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तर अशी परंपरा आणि संस्कार लाभलेले आम्ही “भारतीय”, असे जितेंद्र जोशीने म्हटले आहे.

सचिन कुंडलकरांचा अल्प परिचय

सचिन कुंडलकर हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. कुंडलकर यांनी गंध, हॅप्पी जर्नी, गुलाबजाम असे सिनेमे बनविले आहेत. तसेच कुंडलकर यांनी न्यूड या सिनेमाचे लेखन केले आहे. सचिन कुंडलकर यांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील एका खासगी कंपनीत नोकरी आणि आई पाळणाघर चालवत. पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत (एफ. टी. आय. आय.) या संस्थेत चित्रपटविषयक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार महेश एलकुंचवार यांना जाहीर

News Desk

अभिनयातून साकारलेल्या विविधांगी भूमिकांमुळे अभिनेते इरफान खान रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील !

News Desk

आगमन बाप्पाचे | कोकणात जाणाऱ्या एसटीचे गणपती आरक्षण फुल्ल 

News Desk