HW News Marathi
मनोरंजन

लक्ष्मीकांत-प्रिया यांची हिट केमिस्ट्री

अश्विनी सुतार | दादा कोंडके-उषा चव्हाण, यांच्याप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुण ही मराठी चित्रपटसृष्टीतील रुपेरी जोडी मराठी सिनेमाच्या प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. रुपेरी पडद्यावर जमलेली, खुललेली लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची जोडी खऱ्या जीवनातही तितकीच खुलून आली.

आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया यांच्यासह विवाह केला. तोपर्यंत ‘अशीही बनवा बनवी, डोक्याला ताप नाही ,शेम टू शेम ,कुठं कुठं शोधू मी तिला, नशीबवान’ अशा अनेक मराठी चित्रपटांमधून तर हिंदीत ‘हम आपले हैं कौन, बेटा’ अशा काही निवडक चित्रपटांमधून देखील त्यांनी दोघांनी कामे केली.

प्रिया यांना लक्ष्मीकांत यांच्या आवडीनिवडी माहित असत. लक्ष्मीकांत बेर्डे यांना मासे आवडतात याची कल्पना प्रिया यांना होती. त्यामुळे त्या कायम लक्ष्मीकांत यांच्यासाठी मासे घेऊन यायच्या.

त्याकाळच्या सर्व अभिनेत्रींना आपला हिरो लक्ष्मीकांत असावा असे वाटत असे. परंतु लक्ष्मीकांत यांची सहअभिनेत्री म्हणून पहिली पसंद प्रिया या असायच्या. याच कारण म्हणजे प्रत्यक्ष चित्रपटाच्या सेटवरही त्या दोघांचे एक अनोखे नाते होते. लक्ष्मीकांत यांच्या प्रत्येक चित्रपटाचे आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक प्रिया यांना कायम असायचे. दोघांची ही रुपेरी कमेस्ट्री कधी जुळत गेली हे त्यांना देखील लक्षात आले नाही.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूपच छान होती. त्यांची जोडी प्रेक्षांना जवळची वाटे. १९९०चे दशक हे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अक्षरशः गाजवलं आहे. लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या प्रेक्षकांच्या मनात एक अढळ असे स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत गुणी आणि लोकप्रिय अभिनेते म्हणून आजही ओळखले जातात. त्यांचे चाहते त्यांना कधीही विसरणार नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गांधीजींना पहिल्यांदा कोणी म्हटले महात्मा ?

News Desk

#IndependenceDay : मोदींचा बलुचिस्तानवरून पाकिस्तानवर हल्लाबोल !

News Desk

अरबाजला हनी ट्रॅपमध्ये अडकविल्याचा पोलिसांना संशय

News Desk
राजकारण

सिबीआय कार्यालयाबाहेर राहुल गांधींचे आंदोलन

swarit

नवी दिल्ली । सीबीआय प्रकरणातील कारवाईवरून देशाभरातल्या सिबीआय कार्यालयाबाहेर आज (शुक्रवार) आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल यांनी रात्री १२ वाजताच्या सुमारास त्यांच्या ट्विटर हॅन्डलवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे. हे आंदोलन सकाळी ११ वाजता दरम्यान दिल्ली येथील सिबीआयच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात होईल.

हे आंदोलन राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणार असून राफेल प्रकरण दाबण्यासाठी आणि अनिल अंबानी यांना वाचवण्यासाठी यावरून मोदी सरकारने सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे, असा आरोप राहुल यांनी सरकारवर केला आहे. काल (२५ ऑक्टोबर) राहुल यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेमध्ये मोदींवर घणाघाती हल्ले केले आहेत. सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

सरकारने नियमांचे पालन न करताच आपला पदभार काढून घेतला आहे,असे आव्हान आलोक वर्मा यांच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेतून नमूद केलेआहे. सीबीआयच्या संचालकांना पंतप्रधानांनी मध्यरात्री २ वाजता हटवले आहे. पुरावे नष्ट करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु आहे अशी टीका राहुल यांनी केली आहे.

Related posts

“आमच्या मनात आपणच मुख्यमंत्री आहात”, नवनीत राणांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळा चर्चा

Aprna

“सत्यजीतने फार ताणून न धरता, काँग्रेसचा सहयोगी म्हणून काम करावे”, अजित पवारांची इच्छा

Aprna

जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणारच – नारायण राणे

News Desk