मुंबई। ‘राफेल प्रकरणात मोदी सरकारच्या अडचणी वाढल्यामुळेच सीबीआयचे नाट्य घडवले जात आहे’,असा गंभीर आरोप ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केला आहे. सीबीआयमधील दोन शीर्षस्थ अधिकाऱ्यांना सरकारने आज सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सीबीआयचे दोन अधिकारी आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांचा समावेश आहे. यांपैकी वर्मा यांना चुकीच्या पद्धतीनं पदावरुन हटवल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे. राकेश अस्थाना या वादग्रस्त अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. याविरोधात भूषण सर्वोच्च न्यायलायत जाणार असे यांनी सांगितलं.राफेल डीलमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सीबीआयकडे करण्यात आली होती. ती चौकशी पूर्ण होऊ नये, यासाठी सीबीआयमध्ये हालचाली घडवल्या जात आहेत. असा आरोप भूषण यांनी केला आहे.
Apart from protecting Asthana from investigation, the Rafale complaint by Shourie, Sinha & myself, entertained by the CBI Director, must be another reason for the Govt to remove him with such alacrity by this midnight order https://t.co/vKrR4a9God
— Prashant Bhushan (@pbhushan1) October 24, 2018
काय आहे नेमकं CBI प्रकरण
राकेश अस्थाना यांना सीबीआयचे विशेष संचालक म्हणून पदोन्नती देण्यास आलोक वर्मा यांनी विरोध केला आणि इथेच सीबीआयमध्ये शीतयुद्ध सुरू झाले होते. सीबीआय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करताना अस्थाना यांनी आपल्या शिफारशी धुडकावल्याचं वर्मांना जाणवलं आणि तणाव वाढला. १५ ऑक्टोबरला सीबीआयने अस्थाना यांच्याविरोधात लाच घेतल्याचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर या प्रकरणाची दखल पंतप्रधान मोदींनी ही घेतलीय. हा वाद शमवण्याचं काम ते आपल्या हुकमी एक्क्याकडे – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.