HW News Marathi
राजकारण

“आमच्या मनात आपणच मुख्यमंत्री आहात”, नवनीत राणांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळा चर्चा

मुंबई | “आमच्या मनात आपण मुख्यमंत्री आहात”, असे विधान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केले आहे. नवनीत राणा यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज (11 जानेवारी) अमरावती दौऱ्यावर आहे. नवनीत राणा आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमा हजेरी लावली होती. या कार्यक्रमात भाषण करताना नवनीत राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले आणि विरोधकांवर निशाणा साधला.

नवनीत राणा म्हणाल्या, “सगळ्यांना आपण उपमुख्यमंत्री वाटतात. पण आमची मनापासून इच्छा आहे आमचे मुख्यमंत्री आणि आमच्या सर्वांचे काम आपण ज्या पद्धतीने आमच्या मनात आपण मुख्यमंत्री आहात”, असे म्हटल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या. तसेच समृद्धी महामार्ग लोकसभेत बोलत असताना विरोधकांनी खूप काही बोलले की, “आमच्या सरकारने काय केले. तेव्हा मी सांगितले आमचे मोदीजी दिल्लीत  आणि देवेंद्र फडणवीस जी या राज्यामध्ये. राज्यातून गोवा, गुजरात जिथे जिथे आमच्या देवेंद्र फडणवीस यांचे पाऊल पडले. तिथे तिथे न्यायासाठी लढणार व्यक्ती त्यांच्या पाठिशी आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे,” असेही नवनीत राणांनी म्हटले.

फडणवीसांच्या तिप्पट वयाचे विरोध त्यांच्यासमोर उभे

“मला वाटते देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाचे काही देणे लागते म्हणून या पद्धतीने काम करत आहेत. एक मुलगा म्हणून या धरतीचे काम करत आहेत. आपल्या सर्वांचे कर्तृत्व त्यांच्या पाठिशी उभी आहेत. जे विरोधक त्यांच्यासमोर उभे आहेत. त्यांच्या वयाच्या तिप्पट   वयाचे विरोध त्यांच्यासमोर उभे आहेत. त्यांना टार्गेट करण्याचे काम करत आहे,” असा टोला नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे.

 

 

Related posts

मला रोज एकदा तरी बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही !

News Desk

राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

News Desk

“दादा, तुमचे ऐकत होते म्हणून तर ते आमचे ऐकत नव्हते…”, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला

Aprna