HW News Marathi
मनोरंजन

‘नाळ’ची प्रेक्षकांना भुरळ, पहिल्याच आठवड्यात १४ कोटींची कमाई

मुंबई | गेल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘नाळ’ सिनेमाची प्रेक्षकांशी चांगलीच नाळ जुळलेली दिसून येत आहे. ‘नाळ’ या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात १४ कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती झी स्टुडिओने दिली आहे. ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटानंतर ‘नाळ’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत, असे म्हणणे वावगं ठरणार नाही.

‘सैराट’ पाठोपाठ पहिल्याच आठवडयात सर्वाधिक कमाई करून ‘नाळ’ने एक नवा विक्रम रचला आहे. ‘झी’चा नाळ आणि ‘व्हायकॉम १८’ चा ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या दोन्ही चित्रपटांमध्ये निकोप स्पर्धा दिसून आली. प्रेक्षकांनी दोन्ही सिनेमांवर समसमान भरभरून प्रेम केलेले दिसून येत आहे. मुंबई पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि इतर शहरांमध्येही नाळ चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या आठवड्यातसुद्धा हा चित्रपट सुमारे ४५० चित्रपटगृहे आणि ११,००० शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

देविका दफ्तरदार, श्रीनिवास पोफळे, सेवा चव्हाण, दीप्ती देवी, ओम भुतकर आणि नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. मृदगंध फिल्म्सचे वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर, नितीन प्रकाश वैद्य, प्रशांत मधुसूदन पेठे आणि सुधाकर रेड्डी तसेच नागराज मंजुळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे यांची प्रस्तुती चित्रपटाला लाभली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सुधाकर रेड्डी यांची असून संवाद नागराज मंजुळे यांचे आहेत. चित्रपटाचे संकलन संचारी दास मौलिक यांनी केलंय. सतीश पोतदार, प्रशांत देशमाने यांचे कला दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले असून अद्वैत नेमलेकर यांचे पार्श्वसंगीत आहे. तसेच चित्रपटातील वेशभूषा सचिन लोवाळेकर यांनी साकारली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन… सचिन….

News Desk

सोनाली बेंद्रे लवकरच भारतात परतणार

News Desk

पारंपरिक तिळाच्या वड्या

News Desk